stocks to buy for 3 months by icici direct know target and stoploss details  Sakal
Share Market

Stock To Buy: 3 महिन्यांसाठी 'हे' 3 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला; मिळेल दमदार परतावा

Stock To Buy: शेअर बाजार सध्या सर्वकालीन उच्च पातळीवर (All time high) आहे. सेन्सेक्स 72350 च्या वर तर निफ्टी 21750 च्या वर ट्रेड करत आहे. या वर्षी निफ्टीने सुमारे 20 टक्के परतावा दिला आहे. 2024 मध्येही घोडदौड सुरुच राहिल, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.

राहुल शेळके

Stock To Buy: शेअर बाजार सध्या तेजीत (All time high) आहे. सेन्सेक्स 72,350 च्या वर तर निफ्टी 21,750 च्या वर ट्रेड करत आहे. या वर्षी निफ्टीने सुमारे 20 टक्के परतावा दिला आहे. 2024 मध्येही घोडदौड सुरुच राहिल, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.

मार्केट एवढं उच्चांकावर असताना कोणते शेअर्स घ्यायचे कळत नसेल तर मार्केट एक्सपर्ट्सने तुमच्यासाठी 3 महिन्यांसाठी 3 स्टॉक्स निवडले आहेत. यात गुंतवणूक करुन तुम्ही दमदार परतावा मिळवू शकता असा विश्वास त्यांना आहे.

आयसीआयसीआय डायरेक्टने शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांसाठी इलेक्ट्रिकल उपकरणे बनवणारी कंपनी एचइजी लिमिटेडची (HEG Ltd) निवड केली आहे. सध्या हा शेअर 1930 रुपयांवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेजने हा शेअर 1815-1850 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

पुढील 3 महिन्यांसाठी 2120 रुपयांचे टारगेट आणि 1690 रुपयांचा स्टॉपलॉस त्यांनी निश्चित केला आहे. हा शेअर सध्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर आहे. या शेअरमध्ये एका महिन्यात 23 टक्के आणि तीन महिन्यांत 13 टक्के वाढ झाली आहे.

दुसरा शेअर फार्मा क्षेत्रातील डिव्हीस लॅब (Divis Lab) आहे. हा शेअर सध्या 3,895 रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर 3,700-3,760 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 3 महिन्यांसाठी 4,214 रुपये टारगेट आणि स्टॉपलॉस 3,498 रुपयांवर ठेवला आहे.

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,934 रुपये आहे. हा स्टॉक एका आठवड्यात 7 टक्के, एका महिन्यात सुमारे 4 टक्के आणि तीन महिन्यांत सुमारे 7 टक्के वाढला आहे.

ब्रोकरेजचा तिसरा स्टॉक म्हणजे शिप बिल्डिंग कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्सचा (Garden Reach Shipbuilders) आहे. हा शेअर 862 रुपयांवर आहे. हा शेअर 844 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला गेला आहे.

यासाठी 960 रुपयांचे टारगेट आणि 772 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 975 आहे. हा शेअर एका आठवड्यात सुमारे 6 टक्के, एका महिन्यात 4 टक्के आणि तीन महिन्यांत 4.5 टक्के वाढला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT