sula vineyards share rocketed Wine tourism gets a festive boost  Sakal
Share Market

Sula Vineyards Share: सुला वाइनयार्डचे शेअर्स तुफान तेजीत; ख्रिसमसदरम्यान केला रेकॉर्ड बिझनेस

Sula Vineyards Share: सुला वाइनयार्ड्सच्या (Sula Vineyards) शेअर्समध्ये गुरुवारी 7 टक्क्यांहून मजबूत तेजी पाहायला मिळाली. बीएसईवर हा शेअर 4.76 टक्क्यांच्या वाढीसह 498.20 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, तो इंट्राडे दरम्यान 512 रुपयांवर पोहोचला.

राहुल शेळके

Sula Vineyards Share: सुला वाइनयार्ड्सच्या (Sula Vineyards) शेअर्समध्ये 7 टक्क्यांहून जास्त तेजी पाहायला मिळाली. बीएसईवर हा शेअर 4.76 टक्क्यांच्या वाढीसह 498.20 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, तो इंट्राडे दरम्यान 512 रुपयांवर पोहोचला.

ख्रिसमसच्या शनिवार व रविवार दरम्यान त्यांच्या वाइन टुरिझम बिझनेसला रेकॉर्ड विझिटर्स मिळाल्याचे कंपनीने जाहीर केले. या बातमीनंतर शेअरमध्ये वाढ दिसून आली.

कंपनीच्या वाइन टुरिझम बिझनेसला ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला 5,000 पेक्षा जास्त ग्राहक मिळाले, हा आतापर्यंतचा रेकॉर्ड असल्याचे सुला वाइनयार्ड्सने जाहीर केले. 23 ते 25 डिसेंबर या सणासुदीच्या वीकेंडमध्ये ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. या कालावधीत 12,000 हून अधिक लोकांनी नाशिक आणि बेंगळुरूमध्ये सुला वाईनच्या टुरिझम फॅसिलिटीचा आनंद घेतला.

24 आणि 25 डिसेंबर या दोन्ही दिवशी 13 ऑगस्ट 2023 रोजी सेट केलेल्या 83 लाख रुपयांच्या पहिल्या एका दिवसाच्या कमाईचा विक्रम पार केला. 24 डिसेंबरला त्याने 85 लाखाचा एक रेव्हेन्यू रेकॉर्ड केला. 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत एकूण 2.28 कोटींची कमाई केली.

सुलाच्या वाइन पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या टेस्टिंग्सने 3 दिवसांत 5,300 पेक्षा जास्त इंडिविजुअल टेस्टिंग्सचा विक्रमही केला, ज्याने मागील 3-दिवसीय 4,700 इंडिविजुअल टेस्टिंग्सचा विक्रम ओलांडल्याचे कंपनीने 27 डिसेंबरला एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.

सुलाचा दुसऱ्या तिमाहीत नेट प्रॉफिट 18.4 टक्क्यांनी वाढून 23 कोटीवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 19 कोटी होता. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 51 टक्क्यांनी वाढले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT