Suzlon Energy Ltd Share Sakal
Share Market

Suzlon Energy: सुझलॉन एनर्जीला मिळाली मोठी ऑर्डर; शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता

Suzlon Energy Ltd Share: सुझलॉन एनर्जीला (Suzlon Energy) अप्रवा एनर्जीकडून (Apraava Energy) 300 मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. यानुसार, सुझलॉन एनर्जी पवन टर्बाइनचा पुरवठा करेल आणि प्रकल्प सुरू करण्यासह त्याची देखरेख करेल.

राहुल शेळके

Suzlon Energy Ltd Share: सुझलॉन एनर्जीला (Suzlon Energy) अप्रवा एनर्जीकडून (Apraava Energy) 300 मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. यानुसार, सुझलॉन एनर्जी पवन टर्बाइनचा पुरवठा करेल आणि प्रकल्प सुरू करण्यासह त्याची देखरेख करेल.

सुझलॉन एनर्जीने जारी केलेल्या निवेदनानुसार, कंपनी कर्नाटकातील अप्रवा एनर्जीच्या साइटवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर (HLT) टॉवर आणि 100 विंड टर्बाइन जनरेटर (WTGs) स्थापित करेल. या बातमीनंतर सुझलॉनचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढले. सध्या हा शेअर 38 रुपयांवर ट्रेड करत आहे.

हा प्रोजेक्ट स्वतः SECI (राउंड XIV) लिलावाचा भाग असला तरी, या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (UPPCL) देशात अक्षय ऊर्जेचा प्रवेश वाढवण्यासाठी वापरेल असे सुझलॉन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चालसानी म्हणाले.

या प्रकल्पाअंतर्गत 2.47 लाख घरांना वीज पुरवली जाऊ शकते आणि दरवर्षी 9.75 लाख टन CO2 उत्सर्जन रोखू शकतो.

कंपनीने अप्रवासोबत यापूर्वीही काम केले आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडल्याचा आनंद असल्याचे सुझलॉन समुहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांनी एका निवेदनात सांगितले. तर आम्ही सुझलॉनसोबत भागीदारी सुरू ठेवण्यास उत्सुक असल्याचे अप्रवा एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा म्हणाले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

SCROLL FOR NEXT