SIP Investment Plan  sakal
Share Market

SIP Investment Plan : फक्त 2000 रुपयांनी सुरु करा एसआयपी, आणि रिटायरमेंटसाठीचा फंड आपोआप होईल तयार...

तुम्हाला तुमच्या सेकंड इनिंगसाठी पैसे साठवून आरामाचे आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी एक स्मार्ट टीप घेऊन आम्ही आलो आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त 2000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करावी लागेल, ज्यातून कोट्यवधीचा फंड तयार होऊ शकतो.

सकाळ वृत्तसेवा

तुम्हाला तुमच्या सेकंड इनिंगसाठी पैसे साठवून आरामाचे आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी एक स्मार्ट टीप घेऊन आम्ही आलो आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त 2000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करावी लागेल, ज्यातून कोट्यवधीचा फंड तयार होऊ शकतो. कसे ते जाणून घेऊयात.

तुम्ही फक्त 2000 रुपयांपासून एसआयपी (SIP) सुरू केल्यास तुम्ही सहजपणे कोट्यधीश होऊ शकता. तुम्हाला म्युच्युअल फंडात 2000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करावी लागेल आणि ही गुंतवणूक दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढवावी लागेल. म्हणजे, जर तुम्ही 2000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करत असाल, तर पुढच्या वर्षी तुम्हाला त्यात 200 रुपयांनी वाढ करावी लागेल, म्हणजेच तुम्हाला पुढील संपूर्ण वर्षात 2200 रुपये गुंतवावे लागतील. पुढील वर्षी, 2200 रुपयांच्या 10 टक्के म्हणजेच 220 रुपये जोडावे लागतील आणि वर्षभरात एकूण रक्कम 2420 रुपये होईल.

त्याचप्रमाणे, तुम्हाला दरवर्षी गुंतवणुकीची एकूण रक्कम 10 टक्क्यांनी वाढवावी लागेल. तुमचे उत्पन्न देखील वेळेनुसार वाढते, त्यामुळे दरवर्षी 10 टक्के रक्कम वाढवणे ही काही मोठी गोष्ट नाही. या रणनीतीसह तुम्हाला 30 वर्षे गुंतवणूक करत राहावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही 30 वर्षांमध्ये एकूण 39 लाख 47 हजार 857 रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीचा सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. अशा प्रकारे, 12 टक्के दराने, तुम्हाला 1 कोटी 37 लाख 20 हजार 391 रुपये व्याज म्हणून मिळतील. म्हणजेच तु्म्हाला एकूण 1 कोटी 76 लाख 68 हजार 247 रुपये 30 वर्षांत मिळतील.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT