TATA Group Stock Sakal
Share Market

TATA Group Stock: दोन दिवसांसाठी टाटांचा शेअर खरेदी करा; होईल जबरदस्त नफा, ब्रोकरेज फर्मचा सल्ला

TATA Group Stock: चांगल्या जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी (16 ऑगस्ट) जोरदार सुरुवात केली. बाजारातील रिकव्हरी दरम्यान, तांत्रिक चार्टवर काही शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे.

राहुल शेळके

TATA Group Stock: चांगल्या जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी (16 ऑगस्ट) जोरदार सुरुवात केली. बाजारातील रिकव्हरी दरम्यान, तांत्रिक चार्टवर काही शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी खरेदीसाठी टाटा ग्रुपचा स्टॉक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) शेअर्सची निवड केली आहे. ब्रोकरेजने टीसीएसला 2-3 दिवसांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शुक्रवारी (16 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी वाढला आहे तर निफ्टी देखील 170 अंकांची वाढ नोंदवत आहे. बँक निफ्टी 400 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. तो उघडताच सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला होता. Hindalco, M&M हे निफ्टी वर सर्वाधिक वाढणारे होते. याशिवाय आयटी शेअर्समध्येही चांगली वाढ झाली आहे.

TCS: 2-3 दिवसात नफा होईल

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी टाटा समूहाची कंपनी टीसीएसची तांत्रिक निवड केली आहे. पुढील 2-3 दिवसांच्या दृष्टिकोनातून तुम्ही या शेअरवर लक्ष ठेवा. लक्ष्य किंमत 4520 रुपये आहे. 14 ऑगस्ट 2024 रोजी शेअर 4295 रुपयांवर बंद झाला. स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 5-6 टक्क्यांनी वाढू शकतो.

TCS शेअर्स 3 महिन्यांत 12 टक्के वाढले

शुक्रवारी बाजारात टीसीएसमधील व्यवहार हिरव्या रंगात सुरू झाले. गेल्या एका वर्षात या शेअरने जवळपास 26 टक्के परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉकने 15 टक्के परतावा दिला आहे.

त्याच वेळी, स्टॉकमध्ये 6 महिन्यांत 6 टक्के आणि 3 महिन्यांत 12 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक सुमारे 5 टक्क्यांनी वाढला आहे. बीएसईवरील शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4,431.25 आहे आणि निच्चांक 3,313 आहे. कंपनीचे मार्केट कॅप 15.83 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT