Tata Motors Market Cap eSakal
Share Market

Tata Motors Share : टाटा मोटर्सचे शेअर्स छप्परफाड! मारुतीला मागे टाकत ठरली सगळ्यात जास्त किंमतीची ऑटो कंपनी

Maruti has become the most expensive auto company; बीएसईच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स डीव्हीआर यांचं एकत्रित मार्केट कॅप 3.16 ट्रिलियन रुपये झालं होतं. 30 जानेवारी रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 885.95 रुपये होती.

Sudesh

Tata Motors Market Cap : टाटा मोटर्सने मंगळवारी शेअर मार्केटमध्ये नवा इतिहास रचला. कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांनी वधारून, आपल्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले. यामुळे टाटा मोटर्सचं मार्केट कॅप हे देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती-सुझूकीपेक्षाही जास्त झालं आहे. गेल्या महिनाभराची आकडेवारी पाहिली, तर टाटा मोटर्सचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक वर गेले आहेत.

बीएसईच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स डीव्हीआर यांचं एकत्रित मार्केट कॅप 3.16 ट्रिलियन रुपये झालं होतं. यातील टाटा मोटर्सचा शेअर 2.87 लाख कोटी रुपये आहे, तर टाटा मोटर्स डीव्हीआरचा शेअर 29,226 कोटी रुपये आहे. मारुती सुझूकीचं मार्केट कॅप हे मंगळवारी 3.15 लाख कोटी रुपये होतं.

जेएलआर डिव्हिजनचं यश

टाटाच्या जॅग्वार-लँड रोव्हर (जेएलआर) डिव्हिजनने मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे कंपनीला फायदा झाल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीच्या जेएलआर डिव्हिजनने गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्के अधिक वाहनांची विक्री केली. या डिव्हिजनने एकूण विक्री केलेल्या वाहनांची संख्या तब्बल 1.01 लाख होती. गेल्या 11 तिमाहींमधील हा सर्वोच्च आकडा आहे.

तिमाहीचे रिपोर्ट येणे बाकी

टाटा मोटर्सने अद्याप चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे अधिकृत आकडे जाहीर केलेले नाहीत. JLR डिव्हिजनने मोठ्या प्रमाणात विक्रीची नोंद केली आहे. तसंच कंपनीने पॅसेंजर वाहनांच्या किंमती देखील यावर्षी वाढवल्या आहेत. फेब्रुवारीपासून या वाहनांच्या किंमती 0.7 टक्क्यांनी वाढतील. या दोन गोष्टींमुळे कंपनीचा शेअर जानेवारीपासूनच वर जात आहे. 30 जानेवारी रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 885.95 रुपये होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT