Tata Motors shares jump 4 percent to hit fresh one-year high; analysts see more upside  Sakal
Share Market

Tata Motors: टाटा मोटर्सचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर; सलग पाचव्या दिवशी जोरदार खरेदी, काय आहे कारण?

Tata Motors Stock Price: टाटा समूहाची ऑटो कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ होत आहे. आज कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक तेजीसह रु 896.65 वर पोहोचले. जो विक्रमी उच्चांक आहे.

राहुल शेळके

Tata Motors Stock Price: टाटा समूहाची ऑटो कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ होत आहे. आज कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक तेजीसह रु 896.65 वर पोहोचले. जो विक्रमी उच्चांक आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या तिसऱ्या तिमाहीतील निकालांच्या अपेक्षेने आज सलग पाचव्या दिवशी खरेदीचा कल आहे.

बीएसई इंट्रा-डे वर तो 4.35 टक्क्यांनी वाढून 896.65 रुपयांवर पोहोचला. प्रॉफिट बुकींगमुळे किंमत थोडी कमी झाली पण ती अजूनही चांगल्या स्थितीत आहे. सध्या BSE वर कंपनीचा शेअर 1.90 टक्क्यांच्या वाढीसह 875.60 रुपयांवर आहे. कंपनीचे आर्थिक निकाल 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.

टाटा मोटर्सच्या लक्झरी जॅग्वार लँड रोव्हर (JLR) ची विक्री डिसेंबर तिमाहीत विक्रमी पातळीवर झाली. जग्वार लँड रोव्हरची डिसेंबर तिमाहीत 1.01 लाख वाहनांची घाऊक विक्री झाली.

या आधारावर, डिसेंबर 2023 च्या तिमाहीत टाटा मोटर्सची कमाई आणि नफा देखील वाढण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सचा सुमारे दोन तृतीयांश महसूल जग्वार लँड रोव्हरमधून येतो.

28 मार्च 2023 रोजी टाटा मोटर्सचे शेअर्स मागील वर्षी 400.40 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. या पातळीपासून ते सुमारे 10 महिन्यांत 123.94 टक्क्यांनी उडी मारून आज 31 जानेवारी 2024 रोजी 896.65 रुपयांवर पोहोचले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT