Tata Technologies IPO
Tata Technologies IPO Sakal
Share Market

Tata Technologies IPO : पैसे कमावण्याची सुवर्णसंधी! 19 वर्षांनंतर टाटांची IPO एन्ट्री

सकाळ डिजिटल टीम

Tata Technologies IPO : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासाठी बंपर कमाईची संधी येत आहे. देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे टाटा समूह 19 वर्षांनंतर IPO आणत आहे.

टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजने यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार, हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल आणि त्यात एकही नवीन शेअर जारी केला जाणार नाही.

यामध्ये टाटा मोटर्स व्यतिरिक्त, इतर दोन विद्यमान भागधारक शेअर्सची विक्री करतील. डिसेंबरमध्ये, टाटा मोटर्सच्या बोर्डाने आयपीओद्वारे टाटा टेकमधील काही हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

कंपनी IPO द्वारे सार्वजनिक निधी उभारते आणि कंपनीचे शेअर्स लोकांसाठी जारी करते. टाटा टेक्नोलॉजी ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे आणि कंपनीने 09 मार्च रोजी SEBI कडे DRHP दाखल केला.

या IPO द्वारे, 95,708,984 इक्विटी शेअर्सची विक्री केली जाईल, जे कंपनीच्या एकूण पेड-अप शेअर कॅपिटलच्या 23.60 टक्के आहे. या कंपनीत टाटा मोटर्सचा 74.42 टक्के हिस्सा आहे.\

त्याचप्रमाणे, 8.96 टक्के हिस्सा अल्फा टीसीकडे आणि 4.48 टक्के टाटा कॅपिटल ग्रोथ फंडकडे आहे. टाटा मोटर्स या इश्यूद्वारे 81,133,706 इक्विटी शेअर्सची विक्री करेल.

अल्फा टीसी होल्डिंग्स 9,716,853 इक्विटी शेअर्स आणि टाटा कॅपिटल 4,858,425 शेअर्स विकणार आहेत.

कंपनीने नुकतेच आपले आयपीओ पेपर सेबीकडे दाखल केले आहेत. मात्र, आयपीओच्या माध्यमातून किती निधी उभारला जाईल आणि आयपीओची प्राइस बँड काय असेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील टाटा समूहाचा हा पहिला IPO असेल. Tata Technologies ही डिजिटल, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.

यापूर्वी टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ 19 वर्षांपूर्वी आला होता. टाटा समूहाने 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा IPO आणला. TCS ही आज देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT