TBO Tech IPO  Sakal
Share Market

TBO Tech IPO : टीबीओ टेकचा आयपीओ 8 मेपासून, जाणून घ्या डिटेल्स...

टीबीओ टेकचा (TBO Tech) 8 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये 10 मे पर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल.

सकाळ वृत्तसेवा

टीबीओ टेकचा (TBO Tech) 8 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये 10 मे पर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. कंपनी या आठवड्याच्या अखेरीस या आयपीओसाठीचा प्राइस बँड जाहीर करू शकते.

हा आयपीओ 7 मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. आयपीओअंतर्गत, यशस्वी गुंतवणूकदारांना 13 मे पर्यंत शेअर्सचे वाटप केले जाईल. 14 मेपर्यंत गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात इक्विटी शेअर्स जमा केले जातील.

कंपनी पब्लिक इश्यूमध्ये 400 कोटीचे नवीन शेअर जारी करणार आहे. याव्यतिरिक्त, 1 कोटी 25 लाख 8 हजार 797 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांद्वारे विकले जातील.

प्रमोटर गौरव भटनागर, मनीष धिंग्रा आणि एलएपी ट्रॅव्हल ओएफएसद्वारे 52.12 लाख इक्विटी शेअर्स विकतील, तर गुंतवणूकदार टीबीओ कोरिया आणि ऑगस्टा टीबीओ 72.96 लाख शेअर्स विकतील.

ट्रॅव्हल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म टीबीओ टेकमध्ये प्रमोटर्सकडे 51.26 टक्के आणि पब्लिक शेअरहोल्डर्सचे 46.43 टक्के शेअर्स आहेत. याव्यतिरिक्त, नॉन-प्रमोटर नॉन-पब्लिक शेअरहोल्डर टीबीओ इएसओपी ट्रस्टकडे 2.31 टक्के शेअरहोल्डिंग आहे. ऑगस्टा टीबीओ ही 19.53 टक्के भागीदारीसह सर्वात मोठी सार्वजनिक शेअरहोल्डर आहे. यानंतर, खासगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिककडे 15 टक्के आणि टीबीओ कोरियाचे 11.06 टक्के शेअर्स आहेत.

टीबीओ टेकने पब्लिक इश्यूच्या 75 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवल्या आहेत. ॲक्सिस कॅपिटल, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया आणि जेएम फायनान्शियल हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT