tcs share price share market sebi bse nse tata investment Sakal
Share Market

टीसीएस (शुक्रवारचा बंद भाव : रु. ३,६०४)

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. अर्थात ‘टीसीएस’ ही टाटा समूहातील एक प्रमुख कंपनी असून, देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे.

भूषण गोडबोले

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. अर्थात ‘टीसीएस’ ही टाटा समूहातील एक प्रमुख कंपनी असून, देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. ती वित्त, बँकिंग क्षेत्रातील कंपन्या, विमा क्षेत्रातील कंपन्या, दूरसंचार आणि वाहतूक क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांना आयटी सेवा पुरवते.

सध्याच्या अनिश्चित वातावरणातही कंपनीने व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचे करार केले आहेत. कंपनीने अलीकडेच ‘जग्वार लँडरोव्हर’बरोबर सुमारे एक अब्ज डॉलरचा करार केला आहे. यामुळे कंपनीच्या महसुलात पाच वर्षांमध्ये वार्षिक अंदाजे २० कोटी डॉलरची भर पडण्याची अपेक्षा आहे.

कंपनीने अलीकडेच संपूर्ण भारतभर फोर-जी नेटवर्क तैनात करण्यासाठी ‘बीएसएनएल’कडून सुमारे १५,००० कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे. यावर्षी कंपनीने ‘यूके’ची सर्वांत मोठी पेन्शन योजना ‘नॅशनल एम्प्लॉयमेंट सेव्हिंग्ज ट्रस्ट’ बरोबरदेखील (नेस्ट) सुमारे १.१ अब्ज डॉलरचा करार केला आहे. ‘नेस्ट’साठी ‘टीसीएस’ने २०११ पासून काम केले आहे.

कंपनीचे कार्यक्षेत्रातील कौशल्य, भौगोलिक उपस्थिती आणि क्रॉस-सेल करण्याची क्षमता यामुळे आव्हानात्मक वातावरणातदेखील बाजारातील हिस्सा मिळवत कंपनी व्यवसायवृद्धी करण्याच्या स्थितीत आहे. अनेक नवे वरिष्ठ अधिकारी, जागतिक प्रमुख आणि इतर निष्ठावंत दिग्गजांना जोडून कंपनीचे नवे सीईओ के. कृतिवासन यांनी कंपनीच्या वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वाचे जणू नूतनीकरण केले आहे.

कर्जाचे प्रमाण अत्यल्प ठेऊन धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर प्रतिवर्ष सुमारे ३० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत, ही कंपनी कार्यक्षेत्रात प्रगती करत आहे. सध्या अल्पावधीमध्ये महसुलात वाढ करणे आव्हानात्मक असले,

तरी दीर्घावधीतील मजबूत ऑर्डरबुक, करार अंमलबजावणी क्षमता, कंपन्यांचा डिजिटायझेशन; तसेच क्लाउड तंत्रज्ञानाकडे वाढता कल आदींचा विचार करता जोखीम लक्षात घेऊन या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT