Tech Mahindra sakal
Share Market

Tech Mahindra : टेक महिंद्राच्या 'या' प्लॅनमुळे ब्रोकरेजकडून रेटिंग अपग्रेड

आयटी सेक्टरमधील दिग्गज कंपनी टेक महिंद्राच्या(Tech Mahindra) शेअर्समध्ये सध्या घसरण दिसून येत आहे. पण निफ्टी 50 चा हा स्टॉक एका महिन्यात बहुतेक ब्रोकरेजेसने अपग्रेड केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

आयटी सेक्टरमधील दिग्गज कंपनी टेक महिंद्राच्या(Tech Mahindra) शेअर्समध्ये सध्या घसरण दिसून येत आहे. पण निफ्टी 50 चा हा स्टॉक एका महिन्यात बहुतेक ब्रोकरेजेसने अपग्रेड केला आहे. पुढील तीन वर्षांत कंपनीने आपल्या व्यवसायासाठी तयार केलेल्या धोरणामुळे, टेक महिंद्राचे बाय रेटिंग 14 वरून 21 पर्यंत वाढले आहे, तर होल्ड रेटिंग 13 वरून 10 आणि विक्री रेटिंग 18 वरून 14 वर घसरले आहे.

मार्च 2024 तिमाहीच्या निकालांसह, टेक महिंद्राने 2026-27 या आर्थिक वर्षात 15 टक्क्यांपेक्षा जास्त महसूल आणि ऑपरेटिंग नफ्यात वाढ करण्याची योजना आखली आहे. त्यांचा फोकस क्लाएंट अकाउंट्स, रीस्ट्रक्चरिंग आणि नवीन गुंतवणूकीवर असेल. त्यामुळेच ब्रोकरेज या शेअरबाबत खूप पॉझिटीव्ह आहेत. मात्र, मागणीतील अनिश्चिततेमुळे येत्या काळात महसूल वाढीवर परिणाम होऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर मीडिया टर्मचा आउटलुक सकारात्मक दिसतो.

मॉर्गन स्टॅनलीने आपले रेटिंग अंडरवेटपासून जास्त ओवरवेटपर्यंत वाढवले आहे आणि टारगेट 1190 रुपयांवरून 1490 रुपये केले आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, आर्थिक वर्ष 2027 पर्यंत व्यवस्थापनाची दृष्टी अगदी स्पष्ट आहे. आणखी एक ब्रोकरेज एचएसबीसीने आपले होल्ड रेटिंग 1300 रुपयांच्या टारगेटसह कायम ठेवले आहे. मार्च 2024 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 40.9 टक्क्यांनी घसरून 661 कोटीवर आला आहे. या कालावधीत महसूल 6.2 टक्क्यांनी घसरून 12,871 कोटीवर आला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT