Multybagar Stock  sakal
Share Market

Multibagger stock : जय बालाजी इंडस्ट्रीज या' मेटल स्टॉकने केवळ एका वर्षात गुंतवणुकदारांना केले मालामाल

शेअर मार्केटमध्ये मल्टीबॅगर स्टॉक्स आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा देतात. जय बालाजी इंडस्ट्रीज (Jai Balaji Industries Ltd) हा असाच एक स्टॉक आहे, जो गेल्या एक वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.

सकाळ वृत्तसेवा

शेअर मार्केटमध्ये मल्टीबॅगर स्टॉक्स आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा देतात. जय बालाजी इंडस्ट्रीज (Jai Balaji Industries Ltd) हा असाच एक स्टॉक आहे, जो गेल्या एक वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड या मेटल स्टॉकने अवघ्या एका वर्षाच्या कमी काळात 2,000 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचे शेअर्स सुमारे 15 टक्क्यांनी वाढले आहेत. जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी लोखंड आणि पोलाद उत्पादने तयार करते. कंपनी विविध उत्पादने तयार करते, त्यापैकी काहींमध्ये पिग आयरन, स्पंज आयरन, टीएमटी बार आणि फेरो क्रोम यांचा समावेश आहे. कंपनी आपला व्यवसाय भारतात तसेच भारताबाहेर चालवते.

जय बालाजी इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटल तब्बल 21 हजार कोटी आहे. सध्या त्याचे शेअर्स 1,251.00 रुपयांवर व्यवहार करत आहेत. स्टॉकने फेब्रुवारी 2023 मध्ये 49.65 रुपये ते सध्याच्या किंमतीपर्यंत केवळ एका वर्षाच्या कालावधीत सुमारे 2460 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्याने वर्षभरापूर्वी कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर ती गुंतवणूक यावेळी अंदाजे 25.60 लाख झाली असती.

एकीकडे, आर्थिक वर्ष 2024 मधील दुसऱ्या तिमाहीचा रेव्हेन्यू 1,547 कोटीवरून आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचा रेव्हेन्यू 1,539 कोटीपर्यंत कमी झाला आणि दुसरीकडे, नफा 202 कोटीवरून 235 कोटीपर्यंत वाढला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT