IPO News sakal
Share Market

IPO News : रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमधील 'या' कंपनीचा आयपीओ येणार ; 3,000 कोटी उभारण्याची योजना

रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमधील कंपनी क्लीनमॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्स (CleanMax Enviro EnergySolutions) आपला आयपीओ (IPO) लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीची मालकी सध्या कॅनेडियन गुंतवणूक फर्म ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटकडे आहे.

सकाळ वृत्तसेवा

रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमधील कंपनी क्लीनमॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्स (CleanMax Enviro EnergySolutions) आपला आयपीओ (IPO) लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीची मालकी सध्या कॅनेडियन गुंतवणूक फर्म ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटकडे आहे. ब्रुकफील्डने अलीकडेच काही गुंतवणूक बँकांशी क्लीनमॅक्सचा आयपीओ लॉन्च करण्याच्या योजनांबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनीकडून मिळत आहे. ब्रूकफिल्डने गेल्या वर्षी जूनमध्ये 36 कोटी डॉलर गुंतवून क्लीनमॅक्समध्ये कंट्रोलिंग स्टेक विकत घेतला.

क्लीनमॅक्स कमर्शियल आणि इंडस्ट्रियल संस्थांना हरित ऊर्जा अर्थात ग्रीन एनर्जी प्रदान करते. कंपनीकडे 2 GW चा प्रोजेक्ट पोर्टफोलिओ आहे आणि ती 750 हून अधिक कॉर्पोरेट्सना हरित ऊर्जा पुरवते. त्याच्या ग्राहकांमध्ये टेक्सटाइल्स, ऑटोमोटिव्ह, केमिकल्स, फार्मा, एफएमसीजी आणि डेटा केंद्रांसह विविध उद्योगांमधील कंपन्या समाविष्ट आहेत.

क्लीनमॅक्सच्या आयपीओची साईज सुमारे 2,500 ते 3,000 कोटी असू शकतो आणि ब्रूकफिल्डला हा आयपीओ 10,000 ते 12,000 कोटीच्या व्हॅल्युएशनवर लॉन्च करायचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या आयपीओबाबत चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. पुढील तीन ते चार वर्षांत कंपनीचा पोर्टफोलिओ 5 GW पर्यंत वाढवण्याची योजना आहे.

एप्रिलमध्ये, क्लीनमॅक्सने Apple साठी भारतातील 6 औद्योगिक स्थळांवर रूफटॉप सोलर पॅनेल बसवले, ज्याची एकूण क्षमता 14.4 MW आहे. 2023 मध्ये, कंपनीने गुजरातच्या बाबरा इथे 400 मेगावॅट क्षमतेचा पवन-सौर हायब्रिड प्रोजेक्ट उभारला होता. रिन्यूएबल एनर्जी सेक्टर कंपन्यांमधील गुंतवणुकदारांची आवड अलीकडेच वाढली आहे आणि या आर्थिक वर्षात या क्षेत्रातील आणखी काही आयपीओ दिसू शकतात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT