Abbott India sakal
Share Market

Abbott India : फार्मा सेक्टरच्या 'या' कंपनीकडून तगडा डिव्हिडेंड मिळणार ; चौथ्या तिमाहीत दमदार नफा

ॲबॉट इंडिया (Abbott India ) या फार्मा क्षेत्रातील कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. अशात कंपनीने गुंतवणूकदारांना मोठी भेट देत 410 रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

ॲबॉट इंडिया (Abbott India ) या फार्मा क्षेत्रातील कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. अशात कंपनीने गुंतवणूकदारांना मोठी भेट देत 410 रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीत 287 कोटींचा नफा कमावला आहे, जो वार्षिक आधारावर मागील तिमाहीत 231 कोटींपेक्षा 56 कोटी अधिक आहे. त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्नही 1343 कोटीवरून 1439 कोटीवर पोहोचले आहे.

स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये, कंपनीने गुंतवणूकदारांसाठी 4100 टक्के बंपर लाभांशही जाहीर केला आहे. कंपनीने 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरसाठी 410 रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 8 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे, ज्यामध्ये लाभांश मंजूर केला जाऊ शकतो, त्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांच्या खात्यात 13 ऑगस्ट 2024 रोजी लाभांशाची रक्कम मिळेल असे कंपनीने सांगितले.

ॲबॉट इंडियाचा स्टॉक नुकताच 1.12 टक्क्यांनी म्हणजे सुमारे 289 रुपयांनी घसरला आणि गुरुवारी 25,647 रुपयांवर बंद झाला. याने गुंतवणूकदारांना एका वर्षात सुमारे 20 टक्के आणि 6 महिन्यांत 8.19 टक्के परतावा दिला आहे. ॲबॉट इंडियाचा 52 आठवड्यांचा उच्चांक 29,638.95 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 20,605.05 रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT