IPO News esakal
Share Market

IPO News : तुनवाल ई-मोटर्सचा आयपीओ खुला, जाणून घ्या

IPO News : इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या तुनवाल ई-मोटर्सचा (Tunwal E-Motors) आयपीओ सुरू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

IPO News : इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या तुनवाल ई-मोटर्सचा (Tunwal E-Motors) आयपीओ 15 जुलैपासून सुरू झाला आहे. कंपनीला 115.64 कोटी उभे करायचे आहेत. आयपीओमध्ये 18 जुलैपर्यंत गुंतवणूक करता येईल. यासाठीचा प्राइस बँड 59 रुपये प्रति शेअर आणि लॉट साइज 2000 शेअर्स आहे. 19 जुलै रोजीला शेअर्सचे अलॉटमेंट निश्चित केले जाऊ शकते. तर एनएसई एसएमईवर 23 जुलैला लिस्टिंग होऊ शकते.

तुनवाल ई-मोटर्सची सुरुवात 2018 मध्ये झाली. कंपनी उच्च दर्जाच्या इलेक्ट्रिक दुचाकींचे डिझाईन, डेवलपिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्यूटिंगमध्ये माहिर आहे. त्याची बाजारात 23 मॉडेल्स उपलब्ध आहेत. तुनवाल ई-मोटर्सचे प्रमोटर झुमरमल पन्नाराम तुनवाल, अमितकुमार पन्नाराम माळी आणि झुमरमल पन्नाराम तुनवाल एचयूएफ आहेत. सध्या कंपनीत प्रमोटर्सची हिस्सेदारी 97.04 टक्के आहे. आयपीओनंतर ती 62.34 टक्क्यांवर येईल.

आयपीओमध्ये कंपनी 81.72 कोटीचे 138.5 लाख नवीन शेअर्स जारी करेल. तसेच, 33.93 कोटीच्या 57.5 लाख शेअर्सच्या विक्रीची ऑफर असेल. होरायझन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. तर स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेज प्रायवेट लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत. निकुंज स्टॉक ब्रोकर्स आणि गिरीराज स्टॉक ब्रोकिंग हे इश्यूचे मार्केट मेकर आहेत.

कंपनी आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करून उभारलेल्या पैशाचा वापर वर्किंग कॅपिटलच्या गरजा, रिसर्च आणि डेव्हलपमेंट, इनऑर्गेनिक वाग्रोथढ आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करेल, जे आर्थिक वर्ष 2024 मध्ये 37.85 टक्क्यांनी वाढून 105.53 कोटी झाले आहे. या कालावधीत निव्वळ नफा 217.11 टक्क्यांनी वाढून 11.81 कोटी झाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT