UltraTech Cement Sakal
Share Market

सिमेंट कंपन्यांचे शेअर्स तेजीत; अल्ट्राटेक सिमेंटच्या मार्केट कॅपने पार केला 3 लाख कोटींचा टप्पा

UltraTech Cement: सिमेंटच्या शेअर्समध्ये सध्या चांगलीच तेजी दिसून येत आहे. अशात अल्ट्राटेक सिमेंटच्या (UltraTech Cement) मार्केट कॅपने पहिल्यांदाच 3 लाख कोटीचा टप्पा ओलांडला आहे. सध्या हा शेअर 10445.15 रुपयांवर ट्रेड करत आहे.

राहुल शेळके

UltraTech Cement: सिमेंटच्या शेअर्समध्ये सध्या चांगलीच तेजी दिसून येत आहे. अशात अल्ट्राटेक सिमेंटच्या (UltraTech Cement) मार्केट कॅपने पहिल्यांदाच 3 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सध्या हा शेअर 10445.15 रुपयांवर ट्रेड करत आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप 3,01,537.56 कोटी झाले आहे. शेअरने 10489.40 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.

अल्ट्राटेक सिमेंट भारतातील 20 वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. तसेच हा शेअर निफ्टी 50 मधील टॉप गेनर राहिला. अशात ब्रोकरेज फर्म नोमुराने सिमेंट शेअर्समध्ये मजबूत व्हॉल्यूम वाढीची आशा व्यक्त केली आहे आणि टारगेट प्राइजही वाढवली आहे. त्यामुळेच अनेक सिमेंटच्या शेअर्समध्ये बुधवारी वाढ दिसून आली.

ब्रोकरेज हाऊसने अल्ट्राटेक सिमेंटला 'न्यूट्रल' वरून 'बाय' करण्यासाठी अपग्रेड केले आहे. त्यांनी स्टॉकसाठी 11,500 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. आर्थिक वर्ष 2023च्या पहिल्या सहामाहीत भारताच्या सिमेंट उद्योगात वार्षिक 17 टक्के वाढ झाली आहे.

नंतरही ही तेजी कायम राहण्याची आशा असल्याचे नोमुराने सांगितले. या कालावधीत,सेल्स वॉल्यूम पहिल्या सहामाहीत 11 टक्के आणि वार्षिक 13 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेजने त्याचा आर्थिक वर्ष 2024 साठी इंडस्ट्रीची व्हॉल्यूम ग्रोथचा अंदाज सुधारित करून 12 टक्के केला आहे, जो आधी 8 टक्के होता.

गेल्या एका महिन्यात अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सुमारे 20 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 26 टक्के परतावा दिला आहे. या वर्षात कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 49 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांनी 104 टक्के नफा कमावला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT