Share Market Sakal
Share Market

Share Market Investment: 6 वर्षात 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आणखी तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

पुढच्या महिन्यात कंपनीचे निकाल येणार आहेत.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: वरुण बेव्हरेजेसच्या (Varun Beverages) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कायमच दमदार परतावा दिला आहे. मागच्या सहा वर्षांत हे शेअर्स 1,000 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

आता पुढच्या महिन्यात त्याचे निकाल येणार आहेत, ज्यामुळे त्याच्यात आणखी तेजी येईल असा विश्वास ब्रोकरेजला आहे. सध्याचा विचार केल्यास हे शेअर्स रेड झोनमध्ये आहेत आणि 833 रुपयांवर ट्रेड करत आहेत. पण यात 15-20 टक्क्यांची तेजी येईल असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मिराए ऍसेटचे म्हणणे आहे.

व्हॅल्युएशनच्या चिंतेमुळे वरुणचे शेअर्स मे महिन्यात 873.58 या एका वर्षाच्या उच्चांकावरून खाली आले आहेत. सध्या ते 12 महिन्यांच्या फॉरवर्ड प्राइस-अर्निंग्स रेश्योच्या 50 पटीवर ट्रेड करत आहेत.

जे जगातील 15 सर्वात मोठ्या पेय कंपन्यांमध्ये दुसरे सर्वात महाग व्हॅल्युएशन आहे. याच्या वर फक्त क्लीन एनर्जी ड्रिंक बनवणाऱ्या सेल्सिअस होल्डिंग्सचे शेअर्स आहेत. असे असूनही, मिराए ऍसेटच्या लविता लासराडो यांनी हे शेअर्स अजूनही 15-20 टक्के वाढीचा विश्वास आहे.

पेप्सिकोच्या 90 टक्के उत्पादनांचे बॉटलिंग वरुण बेव्हरेजेस करते. आता ते देशाच्या दुर्गम भागातही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वाढवत आहे ज्याचा फायदा कंपनीला होईल.

वरुण बेव्हरेजेससाठी हा क्वार्टर खूप छान असेल शिवाय निकाल जाहीर झाल्यानंतर वरुण बेव्हरेजेसच्या शेअर्समध्ये चांगली तेजी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT