Vedanta Limited Can Fin Homes announced Dividend  Sakal
Share Market

Dividend Stock: 'या' दोन कंपन्यांनी जाहीर केला डिव्हिडेंड, रेकॉर्ड डेट जवळ

Dividend Stock: शेअर बाजार सध्या ऑल टाइम हायवर आहे. चार ट्रेडिंग सत्रांच्या या आठवड्यात दोन कंपन्यांच्या डिव्हिडेंडची रेकॉर्ड डेट येत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी जेव्हा बाजार उघडेल तेव्हा गुंतवणूकदारांचे या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष असेल.

राहुल शेळके

Dividend Stock: शेअर बाजार सध्या ऑल टाइम हायवर आहे. चार ट्रेडिंग सत्रांच्या या आठवड्यात दोन कंपन्यांच्या डिव्हिडेंडची रेकॉर्ड डेट येत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी जेव्हा बाजार उघडेल तेव्हा गुंतवणूकदारांचे या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष असेल.

यातली पहिली कंपनी वेदांत लिमिटेड (Vedanta Limited Dividend) आहे. तर दुसरी कंपनी कॅन फिन होम्स डिव्हिडेंड (Can Fin Homes Dividend) आहे. या दोन्ही कंपन्या 1100% पर्यंत डिव्हिडेंड देत आहेत.

वेदांता लिमिटेडच्या डिव्हिडेंडची रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट 27 डिसेंबर आहे. कंपनी 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या आधारे 1100 टक्के म्हणजेच प्रति शेअर 11 रुपये डिव्हिडेंड देणार आहे. ही कंपनी 4089 कोटी डिव्हिडेंड म्हणून देत आहे. या आठवड्यात वेदांताचा शेअर 260 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 341 रुपये आणि निचांक 208 रुपये आहे.

आर्थिक वर्ष 2024 साठी वेदांता लिमिटेडद्वारे वितरित केला जाणारा हा दुसरा अंतरिम डिव्हिडेंड आहे. यापूर्वी, कंपनीने मे महिन्यात प्रति शेअर 18.5 रुपये अंतरिम डिव्हिडेंड दिला होता. वेदांता लिमिटेडचा डिव्हिडेंड यील्ड 4.3% आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 1000 रुपये गुंतवले तर त्याला दरवर्षी 43 रुपये डिव्हिडेंड येईल.

तर दुसरीकडे कॅन फिन होम्स ही कंपनी 100% डिव्हिडेंड देत आहे, म्हणजे 2 रुपये फेस व्हॅल्यूच्या आधारावर प्रति शेअर 2 रुपयांचा डिव्हिडेंड मिळेल. आर्थिक वर्ष 2024 साठी कंपनीने दिलेला हा पहिला डिव्हिडेंड आहे.

त्यांचे डिव्हिडेंड यील्ड 0.3 टक्के आहे जे खूप कमी आहे. त्यांची रेकॉर्ड डेट 29 डिसेंबर आहे. हा शेअर सध्या 765 रुपयांवर ट्रेड करत आहे. याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 910 रुपये आणि नीचांक 486 रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : विक्रोळीत चारचाकी वाहनाला भीषण आग

SCROLL FOR NEXT