Vedanta shares fall to the lowest in 31 months after Moody's cuts rating  Sakal
Share Market

Vedanta Shares: वेदांता कर्जाच्या सापळ्यात, मूडीजच्या अहवालानंतर कंपनीला मोठा झटका

Vedanta Shares: वेदांता कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Vedanta Shares: उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता रिसोर्सेस या कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाच्या समस्यांचा सामना करत आहे. आता मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने कंपनीचे क्रेडिट रेटिंग कमी केले आहे.

कंपनीच्या कर्ज परतफेडीबाबत शंका व्यक्त केली जात आहे त्यामुळे कंपनीचे क्रेडिट रेटिंग कमी केले आहे. एवढेच नाही तर मूडीजने कंपनीबाबत आपला नकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे.

त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसत आहे. वेदांता लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. बुधवारी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 210 रुपयांवर पोहोचले. वेदांताचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत.

कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने कमी केलेल्या रेटिंगमुळे झाली. वेदांतावरील कर्जाचा दबाव सतत वाढत आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने वेदांता रिसोर्सेसचे रेटिंग Caa1 वरून Caa2 वर कमी केले आहे.

या वर्षात कंपनीचे शेअर्स 33% घसरले

वेदांता लिमिटेडचे ​​शेअर्स सातत्याने घसरत आहेत. या वर्षी आतापर्यंत वेदांताचे शेअर्स 33% घसरले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी वेदांता लिमिटेडचे ​​शेअर्स 316.10 रुपये होते.

27 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 210 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 6 महिन्यांत वेदांताच्या शेअर्समध्ये 23% ची घसरण झाली आहे.

जानेवारीत 8,300 कोटी रुपये द्यावे लागणार

वेदांता रिसोर्सेस लिमिटेडचे ​​एक अब्ज डॉलर (सुमारे 8,300 कोटी रुपये) किंमतीचे रोखे जानेवारी 2024 मध्येच मॅच्युर होत आहेत. म्हणजे वेदांता कंपनीला हे पैसे व्याजासह परत करायचे आहेत.

मूडीजचे म्हणणे आहे की वेदांता कंपनी आपल्या कर्जासाठी निधी उभारण्यात कोणतीही प्रगती दाखवू शकली नाही. अशा परिस्थितीत पुढील काही महिन्यांत कर्जाबाबतची जोखीम वाढली आहे. त्यामुळे मूडीजने वेदांताचे रेटिंग कमी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT