VVIP Infratech IPO Sakal
Share Market

IPO News: इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ खुला; उभारणार 61.21 कोटी रुपयांचा निधी, गुंतवणूक करावी का?

VVIP Infratech IPO: वीवीआयईपी इंफ्राटेक लिमिटेडचा (VVIP Infratech Limited) 61.21 कोटींचा आयपीओ 23 जुलैपासून खुला झाला आहे. या आयपीओमध्ये 25 जुलैपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमईवर लिस्ट होतील.

राहुल शेळके

VVIP Infratech IPO: वीवीआयईपी इंफ्राटेक लिमिटेडचा (VVIP Infratech Limited) 61.21 कोटींचा आयपीओ 23 जुलैपासून खुला झाला आहे. या आयपीओमध्ये 25 जुलैपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमईवर लिस्ट होतील. VVIP इन्फ्राटेक आयपीओचा प्राइस बँड 91-93 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणुकदारांसाठी लॉट साईज 1200 शेअर्सची आहे. त्यामुळे त्यांना किमान 1 लाख 11 हजार 600 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

प्रवीण त्यागी, वैभव त्यागी आणि विभोर त्यागी हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. कंपनी या इश्यूमधून मिळालेले पैसे भांडवली खर्च, खेळत्या भांडवलाची आवश्यकता, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे आणि इश्यू खर्चासाठी वापरेल. शेअर इंडिया कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही व्हीव्हीआयपी इन्फ्राटेक आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर मशिताला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

सीवरेज, सीवेज ट्रीटमेंट प्लांट अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाण्याच्या टाक्या, वाटर ट्रीटमेंट प्लांट अर्थात जल प्रक्रिया प्रकल्प, वीज वितरण आणि 33 केव्हीए पर्यंतचे उपकेंद्र, जल जीवन मिशन इत्यादी इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये कौशल्य असलेला हा क्लास 'ए' सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. गाझियाबाद स्थित VVIP इन्फ्राटेक लिमिटेड मुख्यत्वे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, NCR दिल्ली आणि भारताच्या इतर उत्तर भागात प्रोजेक्ट्सवर काम करते.

31 मार्च 2023 आणि 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षांमध्ये वीवीआयपी इंफ्राटेक लिमिटेडच्या महसुलात 13.66% वाढ झाली आणि करानंतरचा नफा (PAT) 199.73% वाढला. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या कालावधीत कंपनीचा महसूल 121.96 कोटी होता आणि करानंतरचा नफा 12.26 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT