warren buffetts company berkshire hathaway most expensive shares in world  Sakal
Share Market

Share Market: 4,52,00,000 रुपयांचा एक शेअर, हा आहे जगातील सर्वात महागडा शेअर

Share Market: तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात महाग शेअर कोणता? भारतीय शेअर मार्केटमध्ये अजूनही 5-10 पैशांना शेअर्स मिळतात, म्हणजेच कोणीही ते खरेदी करू शकतात. पण जगातील सर्वात महागड्या शेअरची किंमत ऐकून तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही.

राहुल शेळके

Share Market: तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात महाग शेअर कोणता? भारतीय शेअर मार्केटमध्ये अजूनही 5-10 पैशांना शेअर्स मिळतात, म्हणजेच कोणीही ते खरेदी करू शकतात. पण जगातील सर्वात महागड्या शेअरची किंमत ऐकून तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही. जगातील सर्वात महागड्या एका शेअरची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

जगातील सर्वात महाग शेअर बर्कशायर हॅथवे इंकचा आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत सध्या 5,43,750 डॉलर (USD) आहे, जी भारतीय चलनात (रु. 4.52 कोटी) इतकी आहे. या एका शेअरद्वारे तुम्ही आलिशान घर, कार, बँक बॅलन्स आणि सर्व सुखसोयी मिळवू शकता. शेअरच्या किंमतीत इतके शून्य आहेत की ते मोजताना लोक गोंधळून जातील.

याचा अर्थ हा एक शेअर एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलू शकतो. सामान्य माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यातील कमाईची गुंतवणूक केली तरीही तो बर्कशायर हॅथवे इंकचा एक शेअर खरेदी करू शकणार नाही.

एक शेअर खरेदी करण्यासाठी किमान 4.52 कोटी रुपये लागतील, जे सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहे. बर्कशायर हॅथवेचा शेअर आज नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून जगातील सर्वात महागडा शेअर आहे.

बर्कशायर हॅथवे इंकने गेल्या एका वर्षात 18 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 80 टक्के परतावा दिला आहे. फोर्ब्सनुसार, वॉरन बफेट यांची बर्कशायर हॅथवेमध्ये 16 टक्के भागीदारी आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT