Stocks To Buy Before Budget Sakal
Share Market

Budget 2024: अर्थसंकल्पानंतर गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल; 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष, काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Stocks To Buy Before Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

राहुल शेळके

Stocks To Buy Before Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गेल्या शनिवारी ही माहिती दिली. असे मानले जाते की आगामी अर्थसंकल्प येत्या वर्षात भारताच्या आर्थिक प्रगतीची दिशा ठरवेल.

त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थसंकल्पापूर्वी, उद्योजक आणि SEBI-नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार गौरव गोयल यांनी अर्थसंकल्पातून लाभ मिळण्याची शक्यता असलेल्या प्रमुख क्षेत्रांबद्दल सांगितले. 2024 चे बजेट पाहता त्यांनी काही शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडले आहेत.

शेअर्सची यादी

  • चंबळ फर्टिलाइजर

  • एस्कॉर्ट्स

  • लार्सन आणि टुब्रो

  • जुपिटर वॅगन्स

  • पीएफसी

  • जेएसडब्ल्यू इन्फ्रा

  • कोल इंडिया

  • एचएएल

  • माझगाव डॉक शिप बिल्डर

  • ग्रॅविटा

  • IREDA

  • आयन एक्सचेंज

  • हुडको

कोणत्या क्षेत्रांमध्ये वाढ अपेक्षित आहे?

ग्रामीण/शेती

अलिकडच्या वर्षांत ग्रामीण उपभोग कमी झाला आहे आणि ग्रामीण उत्पन्न शहरी उत्पन्नाच्या अनुषंगाने वाढलेले नाही. अर्थसंकल्पात ग्रामीण आणि कृषी क्षेत्रावर भर असेल, अशी आशा गौरव गोयल यांनी व्यक्त केली आहे.

पायाभूत सुविधा

हे क्षेत्र गेल्या काही वर्षांत चर्चेत आहे आणि येत्या काही वर्षांतही बजेटच्या मथळ्यांमध्ये राहील. रस्ते, रेल्वे, वीज, शिपिंग, लॉजिस्टिक आणि सिमेंट, कोळसा उत्पादक यांसारखी उपक्षेत्रे अलीकडील वाढीनंतरही आकर्षक आहेत.

संरक्षण

या क्षेत्रात स्वदेशीकरण आणि निर्यातीला मोठा वाव आहे. सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देत राहील. आधुनिक युद्ध तंत्रज्ञान जसे की ड्रोन, नौदल, पाणबुड्या इत्यादी खूप लोकप्रिय होतील.

भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर ते कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा, सेमीकंडक्टर, अंतराळ, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहने इत्यादीसारख्या नवीन तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

देशातील नागरिकांना सामान्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाणी, जीवन आणि हवामान ही आणखी एक महत्त्वाची थीम असेल. स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, परवडणारी घरे आणि स्वच्छ हवा यावर भर दिला जाईल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT