Zuckerberg To Get 700 Million dollar A Year From Meta’s New Dividend  Sakal
Share Market

Meta Dividend: फेसबुक पहिल्यांदाच देणार डिव्हिडंड, मार्क झुकरबर्गला मिळणार 5,800 कोटी रुपये

Mark Zuckerberg To Get 700 Million dollar A Year From Meta’s New Dividend: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने प्रथमच आपल्या भागधारकांना डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. सीईओ मार्क झुकेरबर्गला या डिव्हिडंडचा मोठा फायदा होणार आहे.

राहुल शेळके

Mark Zuckerberg Meta’s New Dividend: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने प्रथमच आपल्या भागधारकांना डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. सीईओ मार्क झुकेरबर्गला या डिव्हिडंडचा मोठा फायदा होणार आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालात म्हटले आहे की, मेटाच्या या घोषणेमुळे झुकरबर्ग दरवर्षी सुमारे 700 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 5800 कोटी रुपये कमावणार आहेत.

मेटाने वर्ग A आणि वर्ग B कॉमन स्टॉकवर प्रत्येक तिमाहीत प्रति शेअर 50 पेन्सचा रोख डिव्हिडंड दिला आहे. मार्क झुकरबर्गकडे मेटाचे सुमारे 35 कोटी शेअर्स आहेत. अशा प्रकारे त्यांना प्रत्येक तिमाहीत सुमारे 175 दशलक्ष डॉलर्स मिळतील.

21 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

2022 या वर्षात मेटाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर 2023 वर्ष हे रिकव्हरीचे ठरले. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी गेल्या वर्षी 21 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यानंतर 2023 मध्ये मेटा शेअर्सची किंमत जवळपास 3 पटीने वाढली होती.

मेटा शेअर्सच्या वाढीमुळे मार्क झुकरबर्ग यांना खूप फायदा झाला आहे. मार्क झुकेरबर्ग पुन्हा एकदा जगातील पाच श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीनुसार, मार्क झुकरबर्गची सध्याची एकूण संपत्ती 139.3 अब्ज डॉलर आहे. या संपत्तीमुळे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT