Zomato Legends Service Closed Esakal
Sakal Money

Zomato: झोमॅटो लिजेंड्सच्या डिलिव्हरीची आता वाट पाहू नका... सीईओने एक्सवर नेमकं काय पोस्ट केलं?

Zomato Legends Service Closed: इंटरसिटी लीजेंड्स 2022 मध्ये सुरू केले होते. सुरुवातीला ऑर्डरची किमान मर्यादा नव्हती, परंतु नफा वाढवण्यासाठी किमान ऑर्डर मूल्य 5,000 रुपये सुरू करण्यात आले.

आशुतोष मसगौंडे

देशातील 10 शहरांमधून देशाच्या इतर भागात आयकॉनिक डिशेसची डिलिव्हरी करणारी इंटरसिटी लीजेंड्स सेवा बंद करण्याची घोषणा Zomato ने केली आहे. संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल यांनी नुकतीच एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान कंपनीने जुलैमध्ये ही सेवा तात्पुरती बंद केली होती. पण यातून नफा मिळवण्यासाठी काही बदलांसह सेवा पुन्हा सुरू करण्यात आली, परंतु असे असूनही याचा झोमॅटोसाठी कोणतेही आर्थिक लाभ होत नव्हता. त्यामुळे झोमॅटोचे सह-संस्थापक आणि समूह सीईओ दीपेंद्र गोयल यांनी X वर एका पोस्टमध्ये ही सेवा बंद केल्याचे स्पष्ट केले.

आपल्या पोस्टमध्ये गोयल म्हणाले की, "दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतरही उत्पादनांची बाजारपेठ योग्य न वाटल्यामुळे, आम्ही ही झोमॅटो लिजंड्स सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे."

झोमॅटो महसूल वाढवण्यासाठी आणि बाजारातील स्थिती मजबूत करण्यासाठी इतर क्षेत्रांमध्ये विविधता आणत आहे, आशा वेळी झोमॅटोने इंटरसिटी लीजेंड्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंटरसिटी लीजेंड्स 2022 मध्ये सुरू केले होते. सुरुवातीला ऑर्डरची किमान मर्यादा नव्हती, परंतु नफा वाढवण्यासाठी किमान ऑर्डर मूल्य 5,000 रुपये सुरू करण्यात आले. असे असूनही या प्रकल्पामुळे झोमॅटोला कोणताही फायदा झाला नाही.

झोमॅटोने 2,034 कोटी रुपयांना पेटीएमचे मूव्ही आणि इव्हेंट तिकीट व्यवसाय विकत घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घोषणा झाली.

फूड डिलिव्हरी हा Zomato चा सर्वात मोठा व्यवसाय आहे. त्याचा पहिल्या तिमाहीतील कमाईच्या 46 टक्के वाटा आहे. असे असले तरी त्यांनी त्यांच्या इंटरसिटी सेवेतून किती महसूल मिळाला हे उघड केलेले नाही.

झोमॅटोच्या इतर विभागांमध्ये ब्लिंकिट आणि बिझनेस-फेसिंग किचन सप्लाय प्लॅटफॉर्म हायपरप्युअर यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी तिकीट व्यवसायाला एक वर्षापूर्वीच सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT