चांगले आरोग्य ठेवणे, हा प्रत्येकाचा राष्ट्रधर्म असावा. कारण आजारी लोक हे राष्ट्रावर ताण आणणारे ठरतात. प्रदूषणामुळे आगामी काळात अनेक आजार येऊ शकतात. योगायोगाने आपल्याला सध्या वेळ मिळाला आहे. त्यामुळे आत्मपरीक्षण करा, स्वतःचे आरोग्य मजबूत करा. कारण ‘Healthy People will build Healthy Nation.’
सध्या ॲलोपॅथी, होमिओपॅथी किंवा आयुर्वेद उपचारपद्धतीला अनेक मर्यादा आहेत. कोणत्याही आजारावर उपचार करताना निव्वळ एकच पॅथीवर मर्यादा दिसून येतात. ॲलोपॅथी ही तातडीची उपचार पद्धती असली, तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम मोठे असतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद किंवा होमिओपॅथी चांगले काम करते. आपण जर ॲलोपॅथीला होमिओपॅथी व आयुर्वेदाची जोड दिली, तर ॲलोपॅथीचा डोस कमी करता येईल. त्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणामही कमी होतील. विशेष म्हणजे हे सर्व कमी खर्चात होईल. पण हा एका आजारावर उपचार झाला. आगामी काळात कोरोनासारखे अनेक विषाणू येतील. त्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढविणे हाच पर्याय आहे. विषाणूंशी लढण्याची तयारी आपल्या शरीरात पाहिजे. अशी प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, यावर तज्ज्ञांनी संशोधन करायला हवे.
विषाणूला रोखण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहार. पौष्टिक अन्न घेणे, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा खाणे आवश्यक आहे. पॅकिंग केलेले बाहेरील अन्न, फास्ट फूड टाळले पाहिजे. दुसरी बाब म्हणजे व्यायाम. नियमित व्यायाम करायला हवा. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकाने कमीत कमी ४५ मिनिटे तरी चांगला व्यायाम करणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाॅकडाउन आहे. अशा परिस्थितीत हाॅस्पिलमधील गर्दीही ओसरली. बहुेतक हाॅस्पिटलमध्ये रुग्ण नाहीत. इतरवेळी ओपीडीला रांगा लागायच्या, तर मग कुठे गेल्या या रांगा, असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिकच आहे. याबाबत पुण्यातील संचेती हाॅस्पिटलचे अध्यक्ष डाॅ. पराग संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डाॅक्टरांनी चर्चा केली. तेव्हा खालील मुद्दे लक्षात आले.
स्वच्छता
आपण हात वारंवार धुऊ लागलो. सॅनिटायझर वापरायला सुरूवात केली. मास्क वापरत आहोत. आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत. त्यामुळे शरीराची स्वच्छता चांगल्या पद्धतीने होत आहे. बाहेरील जंतू शरीरात प्रवेश करीत नाहीत.
विश्रांती
आपण पुरेशी विश्रांती घेत आहोत. पुरेशी झोप घेत आहोत. प्रत्येकाने किमान सात सात झोप घेणे आवश्यक आहे. लाॅकडाउनमुळे ही विश्रांतीची, झोपेची गरज पूर्ण होते. त्यामुळे मानसिक संतुलन सर्वांचे चांगले राहते.
तणाव
कमी झालेली स्ट्रेस लेव्हल, बहुतेक आजार हे मानसिक ताणाशी संबंधित असतात. लाॅकडाउनच्या काळात आपल्याला कुटुंबाला जास्त वेळ देता येतो. मित्र, नातेवाईकांशी आपण फोनद्वारे संवाद साधतो. या संवादामुळे तणावाची पातळी आपोआप कमी झाली आहे. यामुळे आरोग्याचा दर्जा सुधारत आहे.
आहार
लाॅकडाउनमुळे हाॅटेल बंद आहेत. आपोआप हाॅटेलिंग पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे फास्ट फूड, मसालेदार चमचमीत पदार्थ, तेलकट पदार्थ, रस्त्यावरील खाणे यापासून सुटका झाली. घरचे आरोग्यदायी खाणे आपल्याला आजारापासून दूर ठेवीत आहे.
प्रदूषण
कार्यालये बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहने नाहीत. कारखाने बंद आहेत. त्यामुळे हवा, पाणी व आवाजाचे प्रदूषण नाही. साहजिकच प्रदूषणापासून होणारे आजार कमी झाले.
व्यसनांवर मर्यादा
कोरोनामुळे सर्व प्रकारच्या व्यसनांवर मर्यादा आली आहे. त्यातून उद्भवणारे रुग्ण कमी झाले.
अपघात
सर्वत्र लाॅकडाउन असल्यामुळे अपघात होत नाहीत. साहजिकच हाॅस्पिटलमध्ये रुग्ण येत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.