संपादकीय

ढिंग टांग! दुर्भिक्ष्याची आर्जवे! 

ब्रिटीश नंदी

किती पाहसी रे किती अंत आता 
पुरे ना अनंता तुझे खेळणे 
असे काय आम्ही कुठे पाप केले 
सेवेत बा काय राही उणे 

माथ्यावरी रोज अस्मान फाटे, 
सत्तेत सुलतानही माजला 
पोटावरी एक मारी तडाखे, 
आसूड पाठीवरी वाजला 

कुणी पेरिला गा शिवारात माझ्या 
असा नष्ट अवकाळ फोफावला 
बियाणेच सारे विषारी निघाले 
अनायास दुष्काळ सोकावला 

सुरु आमुची रोजची रे लढाई 
खलाटीस गेले करंटे जिणे 
कसे बाळगू म्या हत्त्यार बापा 
कुडी वाहिली तूस चिंतामणे! 

आधीचे निघाले, नव्यानेहि आले 
तारेवरी डोलती कावळे 
तरीही निघे पिंड अस्पृश्‍य माझा, 
चोचीविना जीव हाही जळे! 

भाळी असे हे आभाळ आले 
कुणी विंधले, जीर्ण अन फाटके 
सटवाईच्या संहितेतून होती 
साकार दु:खार्त ही नाटके 

नभालाच आली जिथे गा बकाली 
तिथे जीविते रे टिकावी कशी? 
जगण्यातल्या येरझारेत बापा 
कितीदा पडू म्या असे रे फशी? 

कशापायी केले मला तू असे रे 
जाहलो ना असा कास्तकार 
भेगाळले रान, शुष्कावलेले 
आटे जीवनाची अंतिम धार 

डोळ्यांपरी खोल विहिरीत माझ्या 
खडकेल हंडा रिकामा परी 
रक्‍ताळले पाय, छाती फुटे बा 
पाण्याविना काय नेऊ घरी? 

मौनातले गाव ओसाड झाले 
इथे श्‍वास उच्छ्वास होती मुके 
चौकामध्ये रांग ती बादल्यांची 
हापशीस येती सदा आचके 

कुठे रावराण्या, नुरे थेंब काही 
जगातले काय संपे जळ? 
सभोवार येथे धुळीचे उसासे 
तरी श्‍वास उच्छ्वास ये निर्बळ 

इलाख्यातले लुप्त झाले जिव्हाळे 
तळ्याच्या बुडाशी हाडेकातडी 
गिधाडांस येथे मिळे मेजवानी 
निष्पर्ण वृक्षावरी मेलडी 

खुंटावरी बैल बसला, उठेना 
चघाळा न येतो मुखाशी कधी 
हाडेकातडेही न उरले कुडीला 
कशी गा टळावी अशी ही बदी 

तुझे काय जाते अनंता तुला रे 
मिळे सर्व वैकुंठ भोगावया 
कंठून दावी क्षण दोन येथे 
म्हणणार नाहीस- जितं मय:! 

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य माझे 
नको पाहू आता पुरे बा पुरे! 
थकली कुडी ही, निघे प्राण माझा 
ऊर्मी जीवाची आता ना उरे 

कृपाळूपणे येई गावात माझ्या 
पखाली पखाली पाण्यासवें 
भिजो सृष्टी नाथा, पिको भूमी आता 
चरणी तुझ्या रे करी आर्जवे 

- ब्रिटिश नंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप-शिवसेनेत चुरस, काँग्रेसचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर; 'पदवीधर'चे काय?

ST Employees Diwali Salary : ST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! सणाआधीच खात्यात पगार जमा; 391 कोटी रुपयांचा निधी मंजूर, प्रताप सरनाईकांच्या पाठपुराव्याला यश

Supreme Court: शिवसेना खासदारांचे विलीनीकरण, लोकसभा अध्यक्षांनी नोटीसीला उत्तर न दिल्यानं सुप्रीम कोर्टाचा आक्षेप

Marathi News Live Updates : जळगावच्या किनगावमध्ये विजयादशमीच्या मिरवणुकीला अडथळे, हिंदूंच्या अंत्ययात्रांनाही विरोध झाल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मोठी बातमी! नवीन कर्जासाठी CIBIL ची अट नाही... RBI देणार सर्व बँकांना पत्र, शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान देण्याचेही संकेत

SCROLL FOR NEXT