dhing tang sakal media
संपादकीय

ढिंग टांग : मराठी रंगभूमीसाठी…!

सौ. : (नवरा निवांतपणे पेपर वाचत बसल्याचे न पाहवून) अहो, ऐक्लं का? अहो : (या प्रश्नाला मध्ययुगापासून जे उत्तर आहे तेच देत-) हं!

ब्रिटीश नंदी

सौ. : (नवरा निवांतपणे पेपर वाचत बसल्याचे न पाहवून) अहो, ऐक्लं का?

अहो : (या प्रश्नाला मध्ययुगापासून जे उत्तर आहे तेच देत-) हं!

सौ. : (खट्टू चेहऱ्यानं उघड्या कपाटासमोर फतकल मारुन) एक धड साडी नाही माझ्याकडे!

अहो : (बातमी वाचत) हॉरिबल!

सौ : (गैरसमजात रममाण…) तेच म्हंटे मी! आपण आज दुपारी मॉलमध्ये जाऊ या शॉपिंगसाठी! मराठी रंगभूमीसाठी आपण एवढं तरी नको का करायला?

अहो : (पुण्यस्मरणाची नोंद पेपरात वाचत) ॐ शांति: शांति: शांति:!!

सौ : (उजळलेल्या चेहऱ्यानं) अहो, जायचंय नं आपल्याला तेवीस तार्खेला?

अहो : (पेपरात लक्ष…) होऽऽ…! कुठे?

सौ : (किंचित फणकाऱ्यानं) इश्श… कुठं काय, नाटकाला नाही का जायचं आपल्याला? मराठी रंगभूमीसाठी एवढं तरी आपण केलंच पाहिजे!

अहो : (बेसावध नवरा…) कोणाची नाटकं?

सौ : (नाकाचा शेंडा इथं वर होतो…) मला इथं मराठी रंगभूमीची काळजी लागून राहिली आहे, आणि तुम्ही हेटाळणी करा! म्हणून मी नेहमी म्हंटे, तुम्हाला कसली आवड म्हणून नाही!

अहो : (दुर्बळ प्रतिकार करत) आवड नाही कशी? दोन वर्षापूर्वी तुझ्याबरोबर मी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ इतक्या वेळा बघितलं की शेवटी ते प्रशांत दामले मला ऐन स्टेजवरुन हात करायला लागले होते! (हातवारे करुन दाखवत) ‘कसं काय, बरंय ना?’ वगैरे!

सौ : (भावविभोर होत्साती) मलाही कविता लाडनी तीनदा हसून प्रतिसाद दिला होता म्हटलं! पण गेल्या दोन वर्षात साधी तुळशीबागेत गेले नाही मी! साध दहा रुपयांचा बँडसुध्दा नाही घेतलान!

अहो : (दचकून) बँड?

सौ : (कपाटातील कपड्यांची उचकापाचक करत) केस बांधायचा बँड!

अहो : (सुस्कारा सोडत) हांहां…अस्सं होय! मला वाटलं, ‘कोंबडी पळाली’, वगैरे वाजवतात तो वाजंत्रीचा बँड! हाहा!!

सौ : (उत्साहानं) दोन वर्षांनंतर संधी मिळतेय तर नाटकाला नको का जायला?

अहो : (पार गहाळ मेंदूनिशी…) जा की मग! मी पुन्हा तीच तीच नाटकं बघायला येणार नाही! नवं काही आलं तर बघू! बघू म्हंजे…विचार करु या अर्थी!!

सौ : (गळ घालत) प्लीज, काढा ना तिकिटं!

अहो : (खांदे उडवत) छे, आरटीपीसीआरचं सर्टिफिकिट मागतात म्हणे!

सौ : (निर्धाराने) देऊ की! मराठी रंगभूमीसाठी मी नाकात आणि घशात त्या काड्या घालून घ्यायला तयार आहे! बोलवा त्या आरटीपीसीआरवाल्याला!!

अहो : (निरुत्साहाने) छे, भलतंच काहीतरी! इतक्यात नाटकाला जाणं ठीक नाही! सोशल डिस्टन्सिंगचा नियम माहितीये ना? तिथे नाट्यगृहात एक खुर्ची सोडून बसवतात! वडाबिडा खायला सक्त मनाई आहे! सॅनिटायझरचा फवारा मारला की तुला लागोपाठ एकशेसदतीस शिंका येतात, हे विसरु नकोस!

सौ : (नरमाईनं) अहो, मराठी रंगभूमीसाठी-

अहो : पन्नास टक्के थिएटर भरलं की हौसफुल्लचा बोर्ड लावणार आहेत म्हणे! तिकिटं संपली असतील सगळी!

सौ : मराठी रंगभूमीसाठी एवढं तरी-

अहो : (पेपरावर टिचकी मारत) मराठी रंगभूमीसाठी तू सध्या थोडे कांदेपोहे टाक बरं!

सौ : (पदर खोचून) तुमचे ते उधोजीसाहेब टीव्हीवर येऊन कोरोनावर नवं स्वगत म्हणण्याच्या आत मुकाट्यानं चला नाटकाला! सांगून ठेवत्ये!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT