Deepti Gangavane writes philosophy self decision making Guidance 
संपादकीय

मी, माझे, मला?

आपल्या कृती नैतिकदृष्ट्‍या योग्य आहे की अयोग्य यासंबंधीचे नीतिमीमांसेत जे निकष सुचवलेले असतात, ते आपल्याला एखाद्या परिस्थितीत काय करणे योग्य ठरेल याचा निर्णय घ्यायला मार्गदर्शन करतात

दीप्ती गंगावणे

आपल्या कृती नैतिकदृष्ट्‍या योग्य आहे की अयोग्य यासंबंधीचे नीतिमीमांसेत जे निकष सुचवलेले असतात, ते आपल्याला एखाद्या परिस्थितीत काय करणे योग्य ठरेल याचा निर्णय घ्यायला मार्गदर्शन करतात

आपल्या कृती नैतिकदृष्ट्‍या योग्य आहे की अयोग्य यासंबंधीचे नीतिमीमांसेत जे निकष सुचवलेले असतात, ते आपल्याला एखाद्या परिस्थितीत काय करणे योग्य ठरेल याचा निर्णय घ्यायला मार्गदर्शन करतात; तसेच दुसऱ्या कुणाची कृती बरोबर का चूक हे ठरवायला मदत करतात. या दोन्ही प्रकारात निव्वळ भावनेच्या आहारी न जाता काही बुद्धिनिष्ठ निकष वापरल्याने आपण निष्पक्षपातीपणे निर्णय घेऊ शकतो. अर्थात, जो निकष आपल्या कृतीची निवड करताना लावायचा, तोच दुसरीच्या कृतीचे मूल्यमापन करताना लावायचा हे भान असायला हवे. पाश्चात्य नीतिमीमांसेत कृतीची नैतिकता ठरवण्यासाठी मुख्यत: कृती करण्याचा हेतू आणि कृतीचे परिणाम या दोन निकषांचा विचार केला आहे.

पहिल्या प्रकारच्या सिद्धांतांना कर्तव्यवादी म्हणतात. त्यात कृती योग्य आहे की नाही यालाच महत्त्व असते. जी कृती करण्यामागे कर्तव्य करण्याचा उद्देश असतो, ती कृती योग्य असते अशी ही भूमिका आहे. पण आपले कर्तव्य काय, हे कसे ठरवायचे हा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा आपण जे नीतिनियम शिकलेले असतो, त्यांचा आधारे आपले कर्तव्य काय ते ठरवतो, आणि पार पाडतो. पण सगळे नियम नेहमीच योग्य असतात असेही नाही. बहुतेक नियम स्थळ-काळाप्रमाणे बदलणारे असतात. स्वाभाविकच आहे. कारण विशिष्ट परिस्थितीत समाजासाठी काय चांगले ठरेल याबद्दल नियम तयार करणाऱ्यांचे, नियम लागू करणाऱ्यांचे जे आकलन असते, त्यानुसार ते तयार करतात. परिस्थितीत महत्त्वाचे बदल झाल्यावर नियम बदलण्याची लवचिकता समाज व्यवस्थेमध्ये नसेल, तर कालबाह्य नियम समाजाचे नुकसानच करतात. त्याखेरीज अनेकदा परिस्थिती गुंतगुंतीची असेल तर दोन नियमांमध्ये संघर्ष होतो.

हे नियम ज्या कृती करायला सांगतात, त्या परस्परविरुद्ध असतात. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळल्यावर त्या व्यक्तीने जर आपल्याला विनंती केली, की हे माझ्या जोडीदाराला कळू देऊ नकोस, तर आपण काय केले पाहिजे? सांगावे, तर कुणाचा विश्वासघात करू नये या नियमाचा भंग होतो. पण नाही सांगितले तर जाणून-बुजून एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण करू नये हा नियम मोडतो. असे पेच सर्वांनीच अनुभवलेले असतात. प्रचलित नियमांवर विसंबून राहण्यात निर्माण होणाऱ्या या त्रुटी कांट यांच्या कर्तव्यवादी सिद्धांताच्या संदर्भात पुढे येत नाही. कारण त्यांनी मांडलेली निरुपाधिक आदेशाची संकल्पना स्थळ-काळ-व्यक्ति-परिस्थिती निरपेक्ष आहे.

कृतीच्या परिणामांवर कृतीची नैतिक योग्यायोग्यता ठरवणाऱ्या दुसऱ्या प्रकारच्या सिद्धांतांना ‘परिणामवादी’ म्हणतात. हे सिद्धांत असे मानतात की ज्या कृतीचे परिणाम चांगले, ती कृती चांगली आणि तीच नैतिकदृष्टीने योग्य. ज्या कृतीचे परिणाम वाईट, ती कृती वाईट आणि नैतिकदृष्ट्‍या अयोग्य. इथे प्रश्न येतो की परिणाम चांगले आहेत हे कुणी आणि कशाच्या आधारे ठरवायचे? ‘चांगले’ म्हणजे काय? आणि हे परिणाम कुणासाठी चांगले असले पाहिजेत? फक्त कृती करणाऱ्यासाठी की केवळ इतरांसाठी की एकंदरीत सगळ्यांसाठीच? स्वतःच्या हिताचा विचार करण्यात तसे काहीच चुकीचे नाही. ‘मानसशास्त्रीय अहंकेंद्रवाद’ असे सांगतो की प्रत्येक जण वास्तवात स्वतःच्या हिताचा विचार करूनच वागतो. फक्त स्वतःचा विचार करून वागण्याला आपण स्वार्थी वर्तन म्हणतो.

पण नीतिमीमांसेत ‘नीतिशास्त्रीय अहंकेंद्रवाद’ असाही सिद्धांत मांडला आहे. त्यासाठी असे युक्तिवाद केले जातात की प्रत्येकाने स्वतःचे हित जपले तर सर्वांचेच हित जपले जाऊ शकते. त्याचप्रमाणे माणसांचे हित एकमेकांत नेहमीच गुंतलेले असल्यामुळे आपले हित जपताना इतरांचे हित जपावेच लागते हे व्यावहारिक सत्य आहे. या सिद्धांतात मोठी त्रुटी अशी आहे की समाजात वेगवेगळ्या व्यक्तींचे हितसंबंध बऱ्याचदा परस्परविरोधी असतात. हा स्वहितवादाचा सिद्धांत आपल्या स्वाभाविक नैतिक जाणि‍वेच्या विरोधी आहे. त्याला पर्यायी अशा सर्वहितवादाचा परिचय पुढच्या लेखात करून घेऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT