Dipti Gangavane writes Therapy for conceptual clarity
Dipti Gangavane writes Therapy for conceptual clarity sakal
संपादकीय

वैचारिक स्पष्टतेसाठी चिकित्सा

दीप्ती गंगावणे

रोजच्या बोलण्यात आपण नैतिक किंवा अनैतिक असे शब्द क्वचितच वापरतो. त्याऐवजी नैतिक कृत्याला ‘चांगले’ किंवा ‘बरोबर’, ‘योग्य’ असे शब्द वापरतो. ‘वाईट’, ‘चुकीचे’, ‘अयोग्य’ हे शब्द अनैतिक कृतीचे वर्णन करताना उपयोगात आणले जातात.

नीतिमीमांसेतील चर्चेत एखाद्या कृतीचे आपण नैतिकदृष्ट्या मूल्यमापन कसे करावे हा मुद्दा मध्यवर्ती असतो. रोजच्या बोलण्यात आपण नैतिक किंवा अनैतिक असे शब्द क्वचितच वापरतो. त्याऐवजी नैतिक कृत्याला ‘चांगले’ किंवा ‘बरोबर’, ‘योग्य’ असे शब्द वापरतो. ‘वाईट’, ‘चुकीचे’, ‘अयोग्य’ हे शब्द अनैतिक कृतीचे वर्णन करताना उपयोगात आणले जातात. हे शब्द आपण एरवीही वापरत असतो. प्रत्येक प्रसंगात तो शब्द आपण नैतिक अर्थाने वापरत नाही. तत्त्वज्ञानात विचारांच्या स्पष्टतेला खूप महत्त्व दिले जाते. त्यासाठी शब्दांचा वापर करताना त्यांचा अर्थ शक्य तेवढा नि:संदिग्ध असेल, याची काळजी घ्यावी लागते. म्हणूनच वर उल्लेख केलेल्या शब्दांचा वापर नक्की कुठल्या अर्थाने केला आहे हे बघणे आवश्यक असते.

शब्दार्थाच्या सूक्ष्म छटा लक्षात न घेण्याने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. एखाद्याला ‘चांगले’ घर मिळाले किंवा मधुमेह असलेल्या माणसाने खूप गोड खाणे ‘अयोग्य’ आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या शब्दांच्या अर्थात नैतिकतेचा संदर्भ नसतो. पण जेव्हा-जेव्हा या शब्दांचा वापर नैतिकतेच्या परिघातला असतो, तेव्हा त्यांचा संदर्भ व्यक्ती, व्यक्तींचे हेतू, त्यांच्या कृती आणि त्यांचे परिणाम यांच्याशी निगडित असतो. आपल्या महत्त्वाच्या कामासाठी घाई-घाईने जात असताना रस्त्यात अचानक चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला आवश्यक ती सर्व मदत आपण केली, तर ते अतिशय ‘चांगले’ कृत्य असते. या उलट त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून निघून जाणे हे ‘अयोग्य’ असते. या उदाहरणात ‘चांगले’ आणि ‘अयोग्य’ हे शब्द नैतिक दृष्टीने वापरले आहेत.

आपण कशाला नैतिक अर्थाने चांगले किंवा योग्य म्हणतो, ते सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती असते. पण अनेक वेळा असे प्रसंग येतात की काय चांगले काय वाईट; काय योग्य काय अयोग्य याबद्दल आपल्या मनात गोंधळ उडतो. कसोटी बघणारे नैतिक पेच आपल्यासमोर उभे ठाकतात. कधी-कधी या संदर्भात आपले आणि इतरांचे खूप मतभेद होतात. अशा वेळी नैतिकतेचे निकष नक्की काय आहेत याचा विचार करावा लागतो. पाश्चात्य तत्त्वज्ञानातील प्रसिद्ध तत्त्वज्ञ सॉक्रेटस यांच्या तत्त्वचिंतनाचा सगळा भर चांगले जीवन कशाला म्हणावे हे समजून घेण्यावर होता. त्यांच्या काळात ‘सोफिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे जे विचारवंत होते, त्यांचा लोकांवर खूप प्रभाव होता. सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची रेलचेल असलेले जीवन चांगले असे त्यांचे मत होते. त्यांच्यापैकी बहुतेकांना नीतिची काहीच चाड नव्हती. ‘येन केन प्रकारेण’ सुखप्राप्तीसाठी लागणारी संपत्ति, सत्ता इत्यादि मिळवताना प्रसंगी अनैतिक मार्ग चोखाळण्याला त्यांची हरकत नसे. या उलट सॉक्रेटस यांच्या दृष्टीने केवळ भौतिक सुख-समृद्धी असलेले जीवन चांगले नव्हे, चांगले जीवन म्हणजे नीतिमान जीवन.

चांगुलपणा, न्याय, सद्गुण इत्यादी संकल्पनांचा नेमका अर्थ काय आहे हे शोधण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. त्यासाठी समाजातल्या निरनिराळ्या स्तरातील व्यक्तींशी त्यांनी सतत प्रश्नोत्तराच्या स्वरुपात संवाद केला. त्यांच्या हे ध्यानात आणून दिले की ज्या संकल्पना आपल्याला पूर्ण समजलेल्या आहेत, असा त्यांचा समज होता, त्या खरे तर त्यांना समजलेल्या नाहीत, त्यामुळे त्या त्यांना सुस्पष्टपणे मांडता येत नाहीत. एका संवादात आपल्या कृत्याला देवांच्या मान्यतेचा आधार देणार्‍या एका व्यक्तीला त्यांनी विचारलेला अत्यंत कळीचा प्रश्न असा होता की एखादे कृत्य मुळात योग्य असते म्हणून देव त्याला ‘योग्य’ म्हणतात की देव म्हणतात म्हणून ते कृत्य योग्य ठरते? जर ते कृत्य मुळातच योग्य असेल तर त्याची योग्यता देवांच्या मान्यतेवर अवलंबून नसते. देवांनी त्याच्या योग्य असण्या वर शिक्कामोर्तब केलेले असते. कृती योग्य असणे म्हणजे नक्की काय हे समजण्यासाठी ‘देव’ या संकल्पनेचा आधार घेण्याची जरूरच नाही. त्याकरता त्या संकल्पनेचाच अभ्यास करायला हवा. वैचारिक स्पष्टतेसाठी केवळ बुद्धीच्या आधारे तत्त्वज्ञानात केल्या जाणाऱ्या चिकित्सेचा हा उत्तम नमुना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT