einstein sakal
संपादकीय

आइन्स्टाइन यांचे अध्यात्म

अल्बर्ट आइन्स्टाइन हे माझे एक आदर्श आहेत. विशेषतः त्यांच्या अध्यात्माने मला प्रेरित केले आहे. त्यामुळेच त्यांच्या या पैलूविषयी मला लिहावेसे वाटले.

सकाळ वृत्तसेवा

अल्बर्ट आइन्स्टाइन हे माझे एक आदर्श आहेत. विशेषतः त्यांच्या अध्यात्माने मला प्रेरित केले आहे. त्यामुळेच त्यांच्या या पैलूविषयी मला लिहावेसे वाटले.

- डॉ. अनिल के. राजवंशी

प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांची जयंती सोमवारी (ता. १४ मार्च) साजरी झाली. त्यानिमित्त या महान वैज्ञानिकाच्या एका वेगळ्या पैलूविषयी.

अल्बर्ट आइन्स्टाइन हे माझे एक आदर्श आहेत. विशेषतः त्यांच्या अध्यात्माने मला प्रेरित केले आहे. त्यामुळेच त्यांच्या या पैलूविषयी मला लिहावेसे वाटले. खरे तर या शास्त्रज्ञाविषयी आतापर्यंत प्रचंड लिहून झाले आहे. त्याच्या चरित्राविषयी, कार्याविषयीची शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. मला नेहमीच असे वाटत आले आहे, की आइन्स्टाइन हे आध्यात्मिक वृत्तीचे आणि याबाबतीत उत्तरोत्तर परिणत होत गेलेले व्यक्तिमत्व आहे. गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त यांसारखी इतिहासात जी लोकोत्तर व्यक्तिमत्वे होऊन गेली आणि त्यांनी जशी माणसाच्या वैचारिक विकासात, प्रगतीत मोलाची भर घातली आहे, तशीच ती आइन्स्टाइन यांनी घातली आहे. अशी माणसे खूप थोडी असतात, पण या पृथ्वीतलावर येऊन ते मानवी प्रगतीला विलक्षण चालना देऊन जातात. आइन्स्टाइन अगदी लहानपणापासून आध्यात्मिक वृत्तीचे होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून ते देवाची आराधना करीत आणि वेचे म्हणत. ते कविताही करीत असत. त्यांचा अध्यात्माकडे अशलेला कल पुढच्या अभ्यासातही कायम राहिला.

हे विश्व तयार कसे झाले आणि कसे विस्तार पावले याचा अभ्यास जसजसा पुढे जाऊ लागला, तसतशी या विश्वातील सौंदर्यतत्त्वाची अनुभूतीही त्यांना येत होती. त्यांची व्यक्तिगत श्रद्धा ज्या देवावर होती, ती श्रद्धा कालांतराने वैश्विक जाणीवेत परिवर्तीत झाली. या विश्वात जे जे अस्तित्वात आहे, त्या सगळ्यांतील एकत्वाचे दर्शन जिथे घडते, तेव्हा ईश्वरी साक्षात्कार होतो, असे ते मानत. पूंज भौतिकी आणि गुरुत्वाकर्षण यांच्यातील नाते अभ्यासत होते. ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’चा ते अथक शोध घेत होते. पण त्यात यश आले नाही. पदार्थाला अणुत बद्ध करणारी पूंज भौतिकीतील शक्ती इतकी अफाट असते, की गुरुत्वाकर्षणही तेथे लागू होत नाही. फक्त जास्त अंतरावर आणि जास्त वस्तुमान असलेल्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाची शक्ती प्रभावी असते. त्यामुळेच आण्विक वा विद्युतचुंबकीय या अगदी सूक्ष्मतम अशा ठिकाणी गुरुत्वाकर्षण व अन्य शक्ती यांच्यातील नात्याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत.

या विश्वावर परिणाम करणाऱ्या महान शक्तींचे ज्ञान न घेता आपण आपल्या संकुचित कोशात रममाण झालेलो असतो. ज्या क्षणी आपण त्या वैश्विक शक्तींविषयी जाणू लागतो, त्यावेळी आपल्या आधीच्या देवकल्पनेकडून वैश्विक जाणीवेकडे परिवर्तन घडते. ही ‘वैश्विक जाणीव’ लक्षात येणे ही मानवी विकासाच्या उत्क्रांतीतील फार महत्त्वाची गोष्ट आहे; आध्यात्मिकदृष्ट्या आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही. खरे तर हीच बाब या जगात शांतता आणि आनंद मिळवून देईल. या विश्वनियंत्याचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न आइन्स्टाइन यांनी सातत्याने केला. त्यासाठीच ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’चा ध्यास त्यांनी घेतला आहे. देवाविषयी हा शास्त्रज्ञ जेवढे बोलत असे, तेवढे क्वचितच कोणी शास्त्रज्ञ बोलला असेल. आइन्स्टाइन नास्तिक नव्हते. ते अज्ञेयवादी होते.

‘एकत्वा’त दैवत्व

‘अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींमधील एकत्व दाखवून देणाऱ्या स्पिनोझाच्या देवावर माझा विश्वास आहे. मानवी कृती आणि माणसाचे भवितव्य यांत लक्ष घालणाऱ्या देवावर नव्हे,’ असे ते म्हणाले होते. ते खरोखर प्रतिभावंत होते. ज्या ज्या विषयांत ते अभ्यास करीत त्या त्या गोष्टीचे रहस्य उलगडल्याशिवाय राहात नसत. एवढेच नव्हे, तर त्या गोष्टीविषयी पूर्णपणे नवी मर्मदृष्टी ते देत. न्यूटनने गतिकीचा नियम शोधला, प्रकाश, गुरुत्वाकर्षण शक्ती यांचा वेध घेतला; पण त्याचबरोबर त्यांना अधिभौतिकीचेही आकर्षण होते. आइन्स्टाइन यांनाही ते आकर्षण होते. पतंजलींनी ‘योगदर्शन’ ग्रंथात म्हटले आहे, की कोणत्याही गोष्टीच्या सखोल अशा विचारांतून त्या गोष्टीचे यथार्थ दर्शन होते. आइन्स्टाइन हे याचे उत्तम उदाहरण. तेही विषयाचा सखोल विचार करीत. त्यातून त्यांना अंतःस्फूर्ती लाभली होती. देवाचे मन जाणून घेण्यासाठी त्यांनी केलेल्या सखोल अभ्यासामुळे मानवी इतिहासालाच एक वेगळे वळण मिळाले. केवळ या वैचारिक शक्‍तीच्या जोरावर एखादी व्यक्ती आपल्या जागी बसून जग बदलू शकते, हे आइन्स्टाइन यांचे उदाहरण संपूर्ण युवक पिढीसाठी कमालीचे प्रेरणादायी आहे.

(लेखक संशोधक आहेत.)

anilrajvanshi50@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT