संपादकीय

‘सांख्य’दर्शन : ‘चेकलिस्ट’ नावाचे संजीवक साधन

आरोग्य सेवा कशा असतात? स्विस चीझसारख्या! असे चमत्कारिक उत्तर जागतिक पातळीवर ‘त्रुटी तज्ज्ञ’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. जेम्स रीझन यांनी २००० मध्ये दिले.

डॉ. मानसी फडके

आरोग्य सेवा कशा असतात? स्विस चीझसारख्या! असे चमत्कारिक उत्तर जागतिक पातळीवर ‘त्रुटी तज्ज्ञ’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. जेम्स रीझन यांनी २०००मध्ये दिले. दाखला बोलका आहे. स्विस चीझच्या तुकड्यांमध्ये छिद्रे असतात. हे तुकडे एका ओळीत लावले तर त्यातील छिद्रे सहसा एका ओळीत येत नाहीत. त्यामुळे या छिद्रातून बाणासारखी टोकेरी वस्तू जाउच शकत नाही; पण अनेक छोट्या तुकड्यांमधील हीच छिद्रे समजा चुकून एकत्र आली तर त्यातून अपघाताचा महामार्गच खुला होतो! (प्रतिमा पहा). तर, ‘सिस्टिम फेल्युअर’ म्हणजेच प्रणालीचे अपयश हे दर वेळेला मुद्दाम केलेल्या कृतींमुळे होत नाही. कैक वेळेला प्रणालीतील घटकांमधील त्रुटी अजाणता एकत्र येतात आणि मग मोठा धोका उद्भवतो. आरोग्य सेवांमधील धोक्यांच्या वर्णनाकरिता हा दाखल अगदी चपखल ठरतो. गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्य सेवांमध्ये प्रचंड सुधारणा झाली आहे. मृत्यूदरामध्ये घट आली आहे. पण दुसरीकडे आरोग्यसेवांमधील त्रुटी वाढून या त्रुटीच रोगग्रस्ततेकरिता आणि काही वेळेला मृत्यूसदेखील कारणीभूत झाल्या आहेत. आरोग्यसेवांमधील त्रुटींमुळे ओढवलेले किमान ४३ टक्के प्रसंग हे टाळण्यासारखे आहेत, असे त्रुटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा आकडा फारच लक्षणीय आहे. आरोग्य सेवांमधील त्रुटी कशा कमी करता येतील, यावर गेली काही वर्षे ‘जागतिक आरोग्य संघटना’ काम करत आहे.

आरोग्य सेवांतील त्रुटी कमी करण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजेच चेकलिस्ट. सोप्या भाषेत यादी! घाई गडबडीत एखादी महत्त्वाची छोटीशी गोष्ट आपण विसरू शकतो. यादी तसे होऊ देत नाही. शस्त्रक्रियांमध्ये `चेकलिस्ट’ महत्त्वाची ठरते. शस्त्रक्रियेच्या आधी विशिष्ट क्रमाने काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. या प्रक्रिया यादीप्रमाणे पार पडल्यास चमूची कार्यक्षमता वाढते, आरोग्यसेवांचे मानक जपले जाते आणि रुग्णसुरक्षा सांभाळली जाते. ‘जागतिक आरोग्य संघटने’ची ‘सेफ सर्जरी चेकलिस्ट’ ही जागतिक पातळीवर सर्वात प्रसिद्ध असलेली यादी! यामध्ये भूल देण्याआधी, भूल दिल्यानंतर शस्त्रक्रिया सुरु होईपर्यंत आणि शस्त्रक्रिया संपल्यावर लागणाऱ्या प्रक्रियांचा समावेश आहे.

जगातील ७०% देशांमध्ये या यादीची जोड शस्त्रक्रियांना दिली जाते.या यादीचा खरंच फायदा होतो का? संख्याशास्त्रातील मूल्यांकन निकषांचा आधार घेऊन यावर संशोधन होत आहे. यात तीन प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. १. चेकलिस्टमुळे शस्त्रक्रियेच्या यशावर काय परिणाम होतो? २. शस्त्रक्रियेच्या आधी व नंतर होणाऱ्या प्रक्रियांवर प्रभाव पडला का? ३. चमूचे कार्य एकसंधपणे पार पडले का?

पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात भिन्नता आढळते. काही देशांमध्ये शस्त्रक्रियेनंतरच्या रोगग्रस्ततेमध्ये आणि मृत्युदरामध्ये चेकलिस्टच्या वापरामुळे घट झालेली दिसते. काही देशांत तेवढा परिणाम नाही. चेकलिस्टमुळे शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर केलेल्या प्रक्रिया सुधारल्या आहेत. रुग्णसुरक्षेबद्दल दक्षता वाढली आहे. चमूतील संवाद सुधारलेला दिसतो. सांख्यिकी अभ्यासात चेकलिस्टबद्दलची एक नकारात्मक गोष्ट बाहेर आली. जवळजवळ सर्वच देशांमधील कर्मचाऱ्यांनी ‘या यादीमुळे कामाचा वेग कमी होतो’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेने ‘चेकलिस्ट’ बनवतानाच असे सांगितले होते, की शस्रक्रियेच्या आधी प्रक्रियांचा वेग कमी होणे गरजेचे असते! कमी झालेल्या वेगात रुग्णाच्या सुरक्षेबद्दल विचार होऊ शकतो. आता चेकलिस्ट ‘चेक’ करण्याची आणि सुधारण्याची पुढची प्रक्रिया सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : संरक्षण नाही तर 'या' क्षेत्रावर होणार सर्वाधिक खर्च! शेती आणि शिक्षणावर किती खर्च? शेतीसाठी पैसे वाढले?

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Union Budget 2026: पुढील दशक खेळाडूंचे! क्रीडा क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Union Budget 2026: परभणीत चोरट्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT