dr pramod duthade free patient care on holidays
dr pramod duthade free patient care on holidays  sakal
संपादकीय

सुटीच्या दिवशी मोफत रुग्णसेवेचा यज्ञ

मधुकर कांबळे

फिरता दवाखाना दरवेळी कधी शहरात तर कधी ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये पोचतो.

रविवार म्हणजे आरामाचा दिवस, फिरण्याचा दिवस. मात्र, याला अपवाद आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉ. प्रमोद मोतीराम दुथडे. त्यांच्या या दिवसाचीही सुरवात नेहमीप्रमाणे लवकरच होते. सकाळी नऊ वाजता तर ते आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या रुग्णवाहिकावजा फिरत्या दवाखान्यात बसलेले असतात. हा फिरता दवाखाना दरवेळी कधी शहरात तर कधी ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये पोचतो. मिळेल त्या जागेत टेबल-खुर्च्या मांडल्या जातात अन् मग सुरू होतो आरोग्यसेवेचा यज्ञ.

- मधुकर कांबळे, छत्रपती संभाजीनगर

पार्वती हॉस्पिटल हे अनेक रुग्णांच्या ओळखीचं नाव. रुग्णांची कायमच गर्दी. उत्तम वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू तरीही मन संवेदनशील. सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची मनीषा स्वस्थ बसू देत नसल्याने ‘पार्वती प्रतिष्ठान जनकल्याण सामाजिक संस्थे’चा जन्म झाला आणि त्या माध्यमातून ‘वस्ती तिथे आरोग्यसेवा’ हे ब्रीद घेऊन डॉ. प्रमोद दुथडे यांनी २०१५ मध्ये मोफत फिरता दवाखाना सुरू केला.

संचालक डॉ. प्रमोद दुथडे सांगतात, ‘‘मी गेल्या २५ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरातील जयसिंगपुरा भागात वैद्यकीय सेवा देत आहे. एप्रिल २०१५ पासून शहर आणि शहरालगतच्या वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन जे आरोग्यसेवेपासून वंचित आहेत, जे दवाखान्यात जाऊ शकत नाहीत त्यांना वस्ती तिथे या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा देत आहोत. लोकांना तपासून त्यांना वैद्यकीय सल्ला व उपचार दिले जातात. व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शन करून त्यांचे समुपदेशन करतो.’’

असे केले जाते नियोजन

या उपक्रमात माझ्यासह माझ्या रुग्णालयामधील निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित स्टाफ, सिस्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वॉर्डबॉय आणि ॲम्ब्युलन्स चालक सहभागी होत असतात.

कोणत्या दिवशी कुठे मोफत आरोग्यसेवा दिली जाणार आहे त्याचे नियोजन आधीच ठरलेले असते त्याप्रमाणे आधीच माहिती पोचविण्यात आल्याने लोक तिथे जमा होतात. रविवारचा दिवस, सार्वजनिक सुटीचा दिवस बघून हे शिबिर आयोजित केले जाते.

नियोजित दिवशी आम्ही सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडतो. अर्ध्या-एक तासात तिथे पोचतो आणि १० ते दुपारी २ असे तीन तास मी शिबिर घेतो. सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करून त्यांना औषधोपचार देतो. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिक रुग्णांची संख्या अधिक असते.

हा उपक्रम राबवीत असताना ॲनिमिया, सांधेदुखी, त्वचारोग, रक्तदाब, कर्करोगासह मलेरिया, डायरिया, डेंगीचे जास्त रुग्ण आढळत असल्याचे लक्षात येत आहे. महिलांमध्ये रक्ताची कमी असल्यामुळे त्यांना थकवा जाणवायचा. थकवा येतो म्हणून पूर्वी त्या आजारपण अंगावर काढत होत्या. आता त्यांच्यात जागृती

झाली आहे. त्या औषधोपचार घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण जास्त आहे. त्यांना योग्य गोळ्या दिल्याने फरक पडल्याचे सांगतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून हा उपक्रम सुरू केल्याचे समाधान वाटते, असे दुथडे यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वस्ती तिथे मोफत आरोग्यसेवा हा उपक्रम सुरू केला. अनेकजण आजारापासून अनभिज्ञ असल्याने दवाखान्यात जात नाहीत तर काहीजण पैशाअभावी उपचार घेत नाहीत. परिणामी आजार वाढत जातात. यासाठी त्यांना आरोग्यसेवा मिळाव्यात या हेतूने शक्य तितका खारीचा वाटा उचलण्याचे काम सुरू आहे.

- डॉ. प्रमोद दुथडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT