biyanka andrisku 
संपादकीय

मर्म - संमिश्र स्थित्यंतर

सकाळ वृत्तसेवा

ऑलिंपिकसह बहुतांश सांघिक खेळांमध्ये दर चार वर्षांनी होणाऱ्या जागतिक स्पर्धांमधून स्थित्यंतर घडते. टेनिसच्या एका मोसमात चार ग्रॅंड स्लॅम स्पर्धा होतात आणि त्यातील निकालांनुसार खेळ कोणत्या दिशेने सरकतो आहे, याचे चित्र दिसते. सध्या पुरुष आणि महिला टेनिसमध्ये ही प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे. पुरुषांमध्ये रॉजर फेडरर, तर महिलांमध्ये सेरेना विल्यम्स यांच्या कारकिर्दीची तिन्हीसांज झाली आहे. फेडरर ३८, तर सेरेना ३७ वर्षांची आहे. फेडररचे प्रमुख प्रतिस्पर्धी राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच दुखापतींमधून मार्ग काढत आहेत. दोन्ही गटांत नव्या पिढीची प्रामुख्याने तज्ज्ञांना आणि चाहत्यांनासुद्धा प्रतीक्षा आहे. दिग्गजांची पिढी मात्र ‘जुने ते सोने’ ही उक्ती सार्थ ठरविते आहे. या पार्श्‍वभूमीवर सेरेनाने मातृत्वानंतर गेल्या दोन मोसमांत चार वेळा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तिला विंबल्डनमध्ये गतवर्षी जर्मनीची अँजेलिक केर्बर, यंदा रुमानियाची सिमोना हालेप आणि गतवर्षी अमेरिकन स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका यांनी हरविले. या तिघींच्या तुलनेत बियांका आंद्रेस्कूचा विजय सर्वाधिक अनपेक्षित आहे. ती केवळ १९ वर्षांची आहे. चारच स्पर्धांत आणि आधीच्या तीन प्रयत्नांत दुसऱ्या फेरीपुढे मजल मारता आली नसताना बियांका यंदा विजेती ठरली. सेरेनाचे वय ३८ आहे, मातृत्वाच्या वेळी प्रकृतीमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर ती पुनरागमन करते आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे आणि ती सहजी हार मानत नाही, हे पाहता तिलाही दाद द्यायला हवी. पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम, ग्रीसचा स्टीफानोस त्सित्सिपास, जर्मनीचा अलेक्‍झांडर झ्वेरेव असे खेळाडू ‘टॉप थ्री’समोर सक्षम आव्हान निर्माण करू शकत नसताना रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याच्या रूपाने अनपेक्षित पर्याय निर्माण झाला. सेरेनाप्रमाणेच नदालसुद्धा वाढते वय आणि वाढत्या दुखापतींचा निर्धाराने सामना करतो आहे. यानंतरही त्याने यंदा चारपैकी तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत अंतिम फेरी आणि दोन विजेतीपदे अशी कामगिरी केली आहे. तेव्हा त्याला सलाम करायलाच हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT