संपादकीय

दहशतीचा ‘व्यापार’

सकाळवृत्तसेवा

कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकरला पुन्हा अटक झाली आहे. एका खंडणीच्या प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्याच्याबद्दल असे म्हटले जाते, की ‘भाई’चे म्हणजे दाऊदचे इथले व्यवसाय सांभाळण्यासाठीच तो दुबईहून भारतात आलाय.

दुबईहून आल्या आल्या त्याला अटक झाली; पण काही काळातच त्याला जामीन मिळाला. त्याला भारतात पाठवण्यामागे दाऊदचाच मोठा डाव असल्याचे सांगतात. म्हणे, इक्‍बालला राजकारणात प्रवेश करायचाय, लोकप्रतिनिधी व्हायचेय. राजकीय लागेबांधे नेमक्‍या काय स्वरूपाचे असू शकतात, हे स्पष्ट झाल्याने हे हवेतले इमले आहेत, असे म्हणणे योग्य नव्हे.

काही काळापूर्वी म्हणजे ‘सारा-सहारा’प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असताना इक्‍बालने आपले नाव मतदार यादीत नोंदवण्याची मागणी केली होती. न्यायालयानेही या प्रकरणी कुणाचे आक्षेप नसल्यास त्याचे नाव नोंदवण्याचे आदेश दिले होते. कारण, दाऊदवर देशाविरुद्ध कट रचल्याचा आरोप असला, तरी इक्‍बालवर मात्र तसे आरोप नाहीत. त्यामुळे तो भारतात येण्यामागे दाऊद कुटुंबीयांची किमान व्यावसायिक गणिते असतीलच. इक्‍बालचे अनेक व्यवसाय असल्याचे सांगण्यात येते; पण त्याचा मूळ व्यवसाय ‘दहशतीचा व्यापार’ हाच आहे, हे उघड गुपित आहे. शिवाय त्याला अटक झाली आहे, ती बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणीच!

काहींनी तर आता या प्रकरणाच्या सूतावरून, दाऊदलाही अटक करून भारतात आणणे आता दूर नाही, असा सूर लावलाय. दाऊदच्या शेवटाची ही सुरवात असेल, तर उत्तमच आहे; पण दाऊदचे साम्राज्य हे हिमनगासारखे. दिसते त्याहून कितीतरी अधिक आणि कितीतरी वेगळे असू शकते. त्यामुळे या कारवाईकडे तारतम्यानेच पाहायला हवे. कारण, दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील शत्रुत्व स्पष्ट असल्याने इक्‍बालवरही अनेक वेळा हल्ला करण्याचे प्रयत्न राजन टोळीकडून झाले होते. गुन्हेगारी जगतातील काही खबऱ्यांच्या मते इक्‍बाल आणि त्याच्या साथीदारांना त्याच्यावर मोठा हल्ला केला जाणार असल्याची खबर मिळते, तेव्हा तो स्वतःला अटक करवून घेतो. (आणि काही दिवसांत पुन्हा जामीन मिळवून बाहेर येतो.) आता यात तथ्य किती, ते पोलिसांनी शोधायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT