Hous of Bamboo
Hous of Bamboo Sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : मशहूर कहो, या फिर कहो बदनाम...!

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! कादंबरी, कविता, काल्पनिका, ललितनिबंध, चरित्रलेखन वगैरे फालमफोक साहित्याच्या मागे न धावता वैचारिक, चिंतनपर वाङमयाकडे वळण्याचा एकमेव उध्दारमार्ग आता उरला असून, कथा-कादंबऱ्यांच्या विरंगुळाछाप (पक्षी : टिनपाट) आणि भंकस (पक्षी : सुमार) लिखाण आता पुरे झाले, त्याला कवडीची किंमत देता कामा नये. नाहीतरी असल्या बाजारु साहित्याला हल्ली कोण विचारतो? मुळात ते बाजारुच उरलेले नाही. ज्याला बाजारात उठावच नाही, ते कसले बाजारु?

ग्रंथ लिहावा ऐसा पुंडा। त्याचा तिन्ही लोकीं झेंडा।

आपुला आदर्श मानावा गेंडा। जाड कातडीचा।।

...असे कुणीतरी म्हटलेच आहे. कुणीतरी म्हंजे मीच! पण असली (कॉलम सेंटीमीटरवरील) काव्ये आता मी यापुढे करणार नाही. यापुढे सगळे काही अत्यंत वैचारिक आणि ऐतिहासिक लिहायचे ठरवले आहे. माणसाने कसे कायम वैचारिक ताठ्यात असले पाहिजे. तर्काच्या कसोटीवर उतरणारे तेवढेच कागदावर उतरले पाहिजे. ऐतिहासिक समीक्षा हा एकमेव व सर्वोत्तम साहित्य प्रकार आहे. इतिहासावर आधारित बुके लिहून काढणे भारी किफायतशीर आहे, असे माझ्या लक्षात आले आहे.

ऐतिहासिक व वैचारिक लिखाणाचे फायदे : पहिला फायदा म्हंजे लोक ताबडतोब आपल्याला विचारवंत किंवा विद्वान म्हणून ओळखायला लागतात. दुसरा फायदा : गृहपाठासाठी फार कोठे जावे लागत नाही. किंबहुना गृहपाठ करावाच लागत नाही. याचं कारण तोही लेखनाच्या प्रांतातील ‘इतिहास''च झाला आहे. थोड्याफार ‘गुगल’खोरीच्या जोरावर साताठशे पाने सहज मारता येतात. ती कोणीही धड वाचत नाही, परंतु पाव डझन पुरस्कार ‘गारंटी के साथ’ समूळ पदरात पडतात. पुरस्काराच्या भाषणात मात्र इतिहासावर न बोलता वर्तमानातील राजकीय असहिष्णूतेबद्दल चिंता व्यक्त करण्याची दक्षता घ्यावी. त्याने मनुष्य उच्च आणि प्रागतिक कोटीतला ठरतो. तिसरा फायदा : ऐतिहासिक बुके लिहिली की वाद निर्माण होतात. वादामुळे ग्रंथ खपाईस उठाव मिळतो. किंबहुना वादविवाद ही वैचारिक ग्रंथाबाबतची कमर्शियल क्यांपेनच ठरते.

काही मौलिक सूचना : ग्रंथाचे माप आधीच बेतावे. कव्हरवर ‘अमूक अमूक गोष्टीचा साद्यंत इतिहास’ असे उपशीर्षक टाकून द्यावे. (टिप : इथे साद्यंतच्या ऐवजी सर्वंकष, संक्षिप्त, सम्यक, अज्ञात अशी विशेषणेही चालतील.) तथापि, प्रस्तावनेच्या पहिल्या वाक्यातच ‘हा इतिहास नव्हे’ असा डिस्क्लेमरही टाकून द्यावा! इथे निम्मी लढाई जिंकली म्हणून समजावे. इतिहासातील काही वादग्रस्त मुद्द्यांचा उगीचच उल्लेख करावा. काही महत्त्वाचे उल्लेख मुद्दाम टाळावेत. असे झाले की टीकाकारांना आपोआप इसाळ येतो. तसा तो आला की आपले काम फत्ते झाले म्हणून समजावे!!

टायमिंग : या सगळ्या उपक्रमाला टायमिंगचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. टायमिंग जुळले नाही, तर ग्रंथछपाईचा खर्चदेखील निघणार नाही, हे लक्षात ठेवावे. ऐतिहासिक वाद उकरुन काढण्यासाठी वर्तमान पोषक असावे लागते. हे टायमिंग ज्याला जमले, तो उच्चकोटीचा विद्वान होय!

स्थितप्रज्ञता : पब्लिकने समाज माध्यमांमधून जोडे मारले तरी त्याला प्रतिवाद करो नये. वितंडवाद होवो द्यावेत. त्याने आपल्या प्रकाशकांच्या चेहऱ्यावर हसू फुलते. ते लेखकाचा फोन आवर्जून उचलतात! पडून राहिलेल्या प्रतींचे आकडे सांगत नाहीत. कारण खपाईचे आकडे वाढू लागलेले असतात.

सारांश : ‘नको स्तुतीपाठ ओवी। आम्हा गोड शिवी।’ या वृत्तीने सर्वच मराठी साहित्यिकांनी ऐतिहासिक व वैचारिक बुके लिहिली तर मराठी साहित्याला ‘अच्छे दिन’ कां येणार नाहीत?

अर्ज किया है...

मशहूर कहो, या फिर कहो बदनाम, मंजूर है बेआबरु होना, बेखबर नहीं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT