tejashwi yadav
tejashwi yadav 
संपादकीय

तेजस्वींना झालंय काय?

संजय जाधव

‘तेजस्वी यादव यांना पोलिसांनी मारहाण करावी, त्यांना तुरुंगात टाकावे,’ असे उच्चरवाने सांगणारा ज्येष्ठ नेता, त्यावर टाळ्या वाजविणारे पक्ष कार्यकर्ते, हे चित्र आहे खुद्द राष्ट्रीय जनता दलाच्या सभेतील. सर्व काही आलबेल नसल्याची ही चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेजस्वी यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे. 

मागील काही काळापासून तेजस्वी सार्वजनिक जीवनातून गायब झाले होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष आणि कार्यकर्त्यांना उभारी देण्याऐवजी ते विजनवासात गेले. एवढेच काय, पक्षाच्या २२ व्या स्थापनादिनीही त्यांनी हजेरी लावली नाही. लोकसभा निवडणुकीवेळी बिहारमध्ये महाआघाडी करूनही ४० पैकी केवळ एक जागा मिळविता आली. ही नामुष्की होती. आगामी विधानसभा निवडणूक तेजस्वी यांच्यासाठी खरी परीक्षा ठरणार आहे. आरजेडीकडे सध्या विधानसभेच्या सुमारे ८० जागा आहेत. तेजस्वी यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळविल्यास लालूप्रसाद यादव यांचे खरे वारसदार म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब होईल. अपयशी ठरल्यास त्यांचे भवितव्यही टांगणीला लागेल. पक्षामध्ये असंतोष वाढण्यास आणखी एक कारण आहे. मुझफ्फरपूर येथील दीडशेहून अधिक बालकांच्या मृत्यूबाबत पक्षाने न घेतलेली ठोस भूमिका. याचबरोबर बालकांच्या मृत्यूबाबत सरकारला धारेवर धरण्याची संधी तेजस्वी यांच्यामुळे पक्षाने गमावली. 

तेजस्वी जनतेसमोर न येण्याचे खरे कारण हे त्यांचे बंधू तेजप्रताप आहेत. आरजेडीमधून तेजप्रताप यांची हकालपट्टी करावी, अशी अट त्यांनी ज्येष्ठ नेत्यांना घातली आहे. तेजस्वी यांच्या अनुपस्थितीची चर्चा विधानसभेत झाली. ‘तेजस्वी यांना शोधा आणि रोख बक्षीस मिळवा,’ अशी पोस्टरही लागली होती. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांनी ट्‌विट करून ते बिहारमध्येच असून, गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेत असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर पुन्हा ते नुकतेच विधानसभेत प्रकट झाले. पक्षाच्या स्थापनादिनी भूमिका स्पष्ट करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. आता या कार्यक्रमालाच त्यांनी दांडी मारली. 

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे आतापासून मोर्चेबांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी मित्रपक्षांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची गरज आहे. याचबरोबर कुटुंबातील तंट्यामुळे पक्षात फूट पडून विरोधकांना फायदा होऊ नये, ही खबरदारीही घ्यावी लागणार आहे. पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर झाले असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीचे आव्हान त्यांना न पेलता आल्यास ते पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी गमावून बसतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT