Sonali-Navangul
Sonali-Navangul 
संपादकीय

पहाटपावलं : नशब्दांचे अर्थ

सोनाली नवांगुळ

महापुराच्या पाण्यात म्हशी, कुत्री असे प्राणी पोहतानाची दृश्‍यं पाहिली. त्याबद्दल मनोजदादाशी बोलत होते, तर म्हणाला, ‘माझं नदीशी वेगळं नातं आहे. मी गेलं तप नदीच्या प्रत्येक अवस्थेत तिच्यात उतरतोय. पुरात उतरणं होतंच, तो माझा स्वत:शी शोध आहे. पण एका पुरात माझ्या लक्षात आलं, की पाण्यावर म्हशीचं डोकं दिसतंय, ती कदाचित स्वत:ला वाचवत इथंवर आली असावी. नंतर लक्षात आलं ती मला ‘कव्हर’ करत होती. मी काठापाशी सुखरूप जाईपर्यंत तिनं ते केलं. मी खरंच आश्‍चर्यात होतो, की मी तिचा मालक असतो तर तिचं माझं काही नातं असतं, मग तिनं ते करणं लक्षात आलं असतं. मात्र तिच्या किंवा अशा अनेक प्राण्यांच्या वर्तनाचा काय अर्थ लावायचा?’ परवा प्रणव म्हणाला, ‘रात्री दोन-अडीच वाजता शेरू भयंकर अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत, दरवाजापाशी आवाज करत होता. मला वाटलं त्याला ‘हाक’ आली असावी निसर्गाची. बाहेर नेलं, तर त्यानं काहीच केलं नाही. मात्र भयंकर वेगानं हालचाली करत जमीन हुंगत होता. बाहेर रस्त्यावरची कुत्री विचित्र रडत होती. मी घरात आलो शेरूला घेऊन. कुरवाळलं त्याला. सकाळी उठून बातम्या पाहतो तर कोल्हापुरात रात्रीतून आजवर चढलं नाही असं पाणी चढलं होतं! महापुरानं शहराची दैना झाली होती...’

प्राणी आपल्याला काही सांगू पाहतात, त्यांचं ऐकण्याची कला बहुदा मोजक्‍या प्राणीप्रेमींना साधत असावी. असंच काही चाळताना वाचलं की टुलाटुला या आफ्रिकी झुलूलॅंडमध्ये लॉरेन्स ॲन्थनी नावाचा एक माणूस राहायचा जो तिथल्या जंगली हत्तींशी बोलू शकायचा. जगातला पहिला ‘एलिफंट व्हिस्परर’ म्हणायचे त्याला. २०१२ मध्ये हार्ट ॲटॅक येऊन त्याचं निधन झालं. अचानक झालेल्या या घटनेमुळं लॉरेन्सची बायको अतिशय धक्‍क्‍यात होती. दुसऱ्या दिवशी तिला निरोप मिळाला की घराबाहेर हत्तींचा कळप जमलाय, तिनं बाहेर यायला हवं. ती आली नि पाहते तर काय, दहा वर्षांपूर्वी ज्या हत्तींना लॉरेन्सनं वाचवलं होतं, ते हत्ती आपल्या कळपासह जणू तिचं सांत्वन करायला आले होते. दोन दिवस ते हत्ती तिथं थांबले. त्यांना कुठून कळलं असेल लॉरेन्सचं जाणं? इतक्‍या लांबून, खोल जंगलातून रात्रंदिवस प्रवास करत ते नेमके कसे पोचले? - या कशाचंच लॉजिकल उत्तर देता येणं शक्‍य नाही. लॉरेन्सनेच एकदा असं म्हणून ठेवलं होतं - स्वत:पलीकडं विचार करायची अक्षमता हा माणूस या प्रजातीच्या आत्म्याला जडलेला आजारच आहे. प्रत्येक ‘लाईफ फॉर्म’चं महत्त्व नि त्याचा संघर्ष याचा आब असणं नि त्यांच्याबरोबरचा एक निसर्गघटक म्हणून माणसांचं वर्तन, सहजाणीव, प्रतिसाद हा विचार शिक्षणातच असणं जरूरीचंय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT