Sunita-Tarapure 
संपादकीय

पहाटपावलं : कशी सावरू मी?

सुनीता तारापुरे

कालचीच गोष्ट! निघायला नेहमीपेक्षा किंचित उशीर झालेला. ऑफिसची वेळ गाठायची तर घाई करावीच लागणार होती. त्याच गडबडीत स्कूटर स्टॅंडवरून काढताना धडपडले, तोल गेला. आता गाडीसह आपण जमिनीवर आडवे होणार, असं वाटत असतानाच शरीराच्या अशा काही जलद हालचाली झाल्या की मी पडता पडता वाचले. क्षणापूर्वीचं माझं गांगरणं आणि त्यानंतरचं सावरणं, प्रसंगावधान राखत केलेल्या चपळ हालचाली आणि त्यामुळं टळलेली एक छोटीशी दुर्घटना... ऑफिसला जाताना हे सारं मनाशी घोळणं अटळ होतंच. पण, त्यानंतरही दिवसभर तो पाच-दहा सेकंदांचा प्रसंग चलत्चित्राप्रमाणे डोळ्यांसमोर तरळत होता. ही केवळ शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया होती, की शरीर-मनानं एकत्रितरीत्या विचारपूर्वक केलेली कृती हे कळण्याइतका माझा मानसशास्त्राचा अभ्यास नाही. पण, वाटत राहिलं शरीर-मनाची अशी दिलजमाई प्रत्येक वेळी का होत नाही? आपलं शरीर प्रत्येक प्रसंगात अशी विजेसारखी चपळाई का दाखवत नाही? प्रसंगावधानता हा विशेष गुण न होता, सामान्य का असू नये?

सततच सावध राहणं का जमू नये? यात कुचराई कुणाची शरीराची की मनाची? वर्षाच्या आरंभी केलेला नियमित व्यायामाचा संकल्प महिनाभरातच का मोडीत निघतो? आळसावलेल्या शरीराला त्या वेळी हे मन का नाही दक्ष बनवत? खाण्यावर नियंत्रण हवंय हे मनानं मान्य करूनही चमचमीत पदार्थ पाहून जीभेखालून लाळेचं कारंजं का फुटतं? बस्स एकच... म्हणता म्हणता वाटीतले सारेच गुलाबजामून फस्त कसे होतात? ढीगभर कामं समोर दिसत असतानाही घडीभरच्या विश्रांतीकरिता म्हणून विसावलेलं शरीर ताजंतवानं होण्याऐवजी अधिकाधिक आळसावतच का जातं? घर आणि कार्यालय दोन्ही स्तरांवरची कार्यकुशलता वाढवण्यासाठी मनाशी योजिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात का नाही उतरत? कथाविषयच काय, बऱ्याचदा संपूर्ण कथाही मनाशी तयार असते, कागदावर शब्दरूपात साकारण्यास उत्सुक असते, पण मांडी ठोकून लिहिण्याचा कंटाळा येतो तो कशामुळे? या वर्षी थोडं गंभीर वाचन करूया हा वर्षारंभीचा संकल्प मोडीत निघालेला लक्षात येईतो वर्षाचा शेवट दृष्टिपथात असतो.

करमणूकप्रधान आणि उपयोजित का होईना, पण वाचली ना पुस्तकं असा दिलासा मीच मला देऊ लागते ते का? कालच्या शरीर-मनाच्या अफलातून केमिस्ट्रीनं उठलेल्या अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ मनात घोंघावतंय. पाहूया, आता कोण कोणाला सावरतो, शरीर मनाला की मन शरीराला? की दोघे एकदिलाने मला सावरतील!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT