Education
Education 
संपादकीय

स्क्रीनशिवाय शिकू आनंदे

वर्षा सहस्रबुद्धे

लॉकडाउनच्या काळात मुलांचं शिकणं घरच्या घरीच सुरू राहण्यासाठी काय करायचं, हा प्रश्न सध्या विचारला जातोय. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे ‘घरच्याघरीडॉटकॉम’ ही वेबसाईट. तिचा वापर करून शिक्षणविचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लहान मुलांना स्क्रीन नकोच!
सध्याच्या कठीण परिस्थितीमुळे शिक्षण म्हणजे काय याबद्दल, एक समाज म्हणून आपली समज काय आहे, हे तपासून बघण्याची संधी खरं तर आपल्याला मिळाली. पण, मुलं आता शिकणारच नाहीत, ‘मागे’ पडतील, असं अनेकांना वाटायला लागलं. इतर देशांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू झाले, तसंच आपणही करायला लागलो. एकंदर परिस्थिती काहीशी गोंधळाची होती. भांबावलेले पालक, आलेल्या लिंक्‍स उघडून देऊन लहानग्या मुलांनाही स्क्रीनसमोर निष्क्रिय बसवायला लागले.

पालकांचा सहभाग महत्त्वाचा 
स्क्रीनसमोरच्या तीस-चाळीस मुलांचे माईक म्यूट करून स्क्रीनवर एकतर्फी मांडणी होते. त्यातून लहान मुलांचं खरं शिक्षण होत नाही. मुलांचे प्रतिसाद आणि सहभाग घेत शिकवणं पुढे जातं, तेव्हाच शिकणं घडतं. लहान मुलांशी शिकवणाऱ्या व्यक्तीची होणारी देवघेव शिकण्याच्या प्रक्रियेत खूप महत्त्वाची असते. सध्या ही देवघेव निर्धोकपणे आणि निश्‍चिंतपणे करू शकतील, अशा व्यक्ती म्हणजे मुलांचे कुटुंबीय. आपल्या मुलाबरोबर काय काय करता येईल, हे पालकांनी वेबसाईटवरून समजून घ्यावं आणि घरच्या घरी मुलांना प्रत्यक्ष शिकायला मदत करावी यासाठी काम करायचं असं ठरवलं.

मुलांनी कृती करावी
व्हिडिओसाठी आवश्‍यक असलेलं नेटवर्क-कव्हरेज ज्या-ज्या ठिकाणी नाही, अशाही ठिकाणच्या पालकांचा विचार ही वेबसाईट करताना मनात होता. शहरातल्या, तसंच अशा ठिकाणच्या पालकांसाठी ही वेबसाईट तयार केली आहे. कृती सुचवताना शहर-गाव, लहान घर-मोठं घर, वस्ती-अपार्टमेंट, वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती, संस्थेच्या घरात राहणारी मुलं अशा विविध पार्श्वभूमींचं भान ठेवायचा प्रयत्न केला आहे. घरातलं साहित्य, किंवा अगदी कमी खर्चात मिळेल असं साहित्य वापरून कृती कशा घेता येतील, हे विचारात घेतलं आहे.

पालक आपल्या मुलाच्या वयाला योग्य अशी कृती उघडून, त्यात सांगितल्याप्रमाणे घरीच मुलाबरोबर काम करू शकतील. पालक अल्पशिक्षित असतील, तर ताई-दादा कृतीचा मजकूर आई-बाबांना वाचून दाखवतील, आणि आई-बाबा ती कृती घेतील. शिक्षकही रोज आपल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना यातल्या योग्य त्या एकेका कृतीचा दुवा पाठवू शकतील, शक्‍य तर त्या पानाचा प्रिंटआऊट काढून पालकांना देऊ शकतील. वेबसाईटवरच्या कृती, शाळा सुरू झाल्यावर, शाळेतही करता येतील. विशेष गरज असलेल्या मुलांच्या पालकांनाही यापैकी काही कृती, खेळ आपल्या मुलांसाठी नक्की सापडतील. साथीदार शिशुविकास आणि शिशुशिक्षण या क्षेत्रात ओढीनं काम करणाऱ्या ‘द फर्स्ट थ्री’च्या सूनृता सहस्रबुद्धेनं या वेबसाईटची निर्मिती केली. अनेक मैत्रिणींचं सहकार्यही लाभलं. वेबसाईटचा वापर करण्यासाठी कोणतंही शुल्क नाही. महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या पालकांनी मुलांसाठी ‘घरच्या घरी’चा मुक्तपणे उपयोग करावा. लहान मुलांसाठी काम करणाऱ्या शिक्षणसंस्था, शाळा, ‘एनजीओ’ यांनीही अवश्‍य यातले दुवे मुलांसाठी पालकांपर्यंत पोचवावेत. 

कुठे दिसला, कसा दिसतो, काय करतो...?
अनुभव, निरीक्षण या गोष्टी शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यासाठी अनेक प्रयोगक्षम पाठ तयार करण्यात आले आहेत. त्याचा हा एक वानोळा.    
परिसर अभ्यास : (दुसरी, तिसरी)
आपल्या घराच्या आसपास कधी न कधी पक्षी दिसतात. मुलांना पक्ष्यांचं निरीक्षण करू दे.
मुलांना त्यांचं वर्णन स्वतःच्या शब्दांत करू दे.
१) कुठे दिसला?
२) स्वस्थ बसला होता की हालचाल करत होता? काय करत होता? कशासाठी?
३) केवढा होता? माहीत असलेल्या पक्ष्याच्या तुलनेत केवढा होता हे विचारा. उदाहरणार्थ,
चिमणीएवढा की चिमणीहून लहान की चिमणीहून थोडासा मोठा? कावळ्याएवढा की
कावळ्याहून लहान की कावळ्यापेक्षा जरा मोठा?
४) त्याच्या अंगाचा रंग दिसला का? कसा होता? त्याचे कोणते रंग आपल्या डोळ्यांत भरले?
५) चोच कोणत्या रंगाची होती? चोचीचा आकार कसा होता?
६) पक्ष्याचा आवाज ऐकू आला का? तो शब्दात लिहायचा प्रयत्न केला तर कसा लिहिता येईल?
७) यापैकी जे जे दिसलं असेल, त्याबद्दल मुलाला बोलू दे आणि नंतर लिहू दे. लिहिताना लागेल तिथे मुलाला मदत करा.
( पक्ष्याचं चित्र मुलाला काढू दे. मुलाला जमेल तसं चित्र काढू दे. चित्र खऱ्या पक्ष्यासारखं नसेल, सफाईदार नसेल, तरी चालेल, पण मुलाचं स्वतःचं असू दे.)

(लेखिका प्रयोगशील शिक्षणक्षेत्रात काम करतात.) gharchyagharee@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT