gujarat titans cricket Team
gujarat titans cricket Team Sakal
editorial-articles

अग्रलेख : क्रिकेटचे ‘गुजरात मॉडेल’

सकाळ वृत्तसेवा

गुजरात टायटन्सच्या संघाने पदार्पणातच आय.पी.एल.चे विजेतेपद मिळवले, हा योगायोग विलक्षण असला तरीही समाजमाध्यमांवरील चर्चा मात्र निराळ्याच दिशेने वाहात चालली होती.

गुजरात टायटन्सच्या संघाने पदार्पणातच आय.पी.एल.चे विजेतेपद मिळवले, हा योगायोग विलक्षण असला तरीही समाजमाध्यमांवरील चर्चा मात्र निराळ्याच दिशेने वाहात चालली होती. अर्थाच गुजरात टायटन्सच्या संघाचे श्रेय त्यामुळे कमी होत नाही. साखळी स्पर्धेत त्या संघाने सतत पहिला क्रमांक राखला. विजेतेपद मिळविण्यासाठी लागणारे सातत्य हार्दिक पंड्याच्या या संघाने दाखवले, त्यामुळे त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ लीगमध्ये पहिल्या फटक्यात यशस्वी होण्यासाठी जे ‘गुजरात मॉडेल’ तयार केले गेले, त्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. कमालीची लोकप्रियता, अफाट पैसा आणि त्याला अधूनमधून वादाची फोडणी मिळत असली, तरीही नंबर वन असलेल्या ‘आयपीएल’मध्ये गेली १४ वर्षे मक्तेदारी असलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ यंदा तळाला घुटमळत असताना नवा संघ तयार होतो आणि आपल्या आगमनाची वर्दी विजेतेपदाने देतो, हे स्तिमित करणारे आहे. गुजरातच्या विजेतेपदाचे शिलेदार कोणी परग्रहावरून आलेले नाहीत, तर मुंबई संघाचा हार्दिक पंड्या, हैदराबादचा रशीद खान, कोलकताचा शुभमन गिल वा पंजाब संघातून खेळलेला डेव्हिड मिलर असेच इतर संघातून आलेले खेळाडू. या सर्वांची मोट बांधण्यात आली. त्यांचा प्रशिक्षक असलेला आशीष नेहरा हा काही या क्षेत्रातील अनुभवी नाही; पण त्यांच्या साथीला भारताच्या विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन होते.

एकीकडे विजेतेपद कसे मिळवाचे, याचे नवे समीकरण तयार होत असताना जवळपास दीड महिना, ७०पेक्षा अधिक सामने, दहा संघ अशी ही सर्कस केवळ क्रिकेटपुरती मर्यादित कधीच नव्हती. महालिलावात कोट्यवधी रुपयांची झालेली उधळण, विजेतेपदामुळे गुजरातवर २० कोटी रुपयांचा वर्षाव, जोस बटलर या इंग्लंडच्या खेळाडूला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ठेवण्यास बॅगाही अपुऱ्या, असे एकंदर या `आयपीएल’चे चित्र होते. दहा संघ झाल्यामुळे आता व्यवहारही वाढले आहेत. एकूणच ही ‘आयपीएल’ म्हणजे कमीत कमी पाच हजार कोटींची उलाढाल! बीसीसीआयच्या श्रीमंतीचा हा एका वर्षाचाच वाटा. यावरून ‘आयपीएल’ केवळ क्रिकेटसाठी नव्हे, तर देशाच्याही आर्थिक घडामोडीत किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होते. दीड वर्ष (२०२० पूर्ण आणि २०२१ अर्धे) ‘आयपीएल’ संयुक्त अरब आमिरातीत खेळवण्यात आली; पण यंदा पूर्ण ‘आयपीएल’ देशात खेळवण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलण्यात आले. गेल्या वर्षी याच मे महिन्यात कोरोनाने हैदौस घातला होता. प्राणवायूसाठी प्राण कंठाशी येत होते. कधी कोण सोडून जाईल, याची शाश्वती नव्हती; पण त्यानंतर वर्षभरातच एक लाखाहून अधिक प्रेक्षक अंतिम सामना पाहण्यासाठी एकत्र येतात, ही उत्साह वाढविणारी,उमेद जागवणारी बाब आहे.

काही महिन्यांपूर्वी टोकियोने ऑलिंपिक यशस्वी करून आता थांबायचे नाही... असा संदेश जगाला दिला होता. दहा संघांची ‘आयपीएल’ कोणतेही विघ्न न येता बीसीसीआयने यशस्वीपणे पार पाडून क्रिकेटविश्वासाठीही प्रारूप तयार केले; पण त्यासाठी सर्कशीचे बिऱ्हाड मुंबई, नवी मुंबई, पुण्यापर्यंत मर्यादित ठेवले आणि बाद फेरींच्या सामन्यांसाठी कोलकता आणि गुजरात असे सीमोल्लंघन केले. गतर्षीच्या वाईट परिस्थितीमुळे बीसीसीआयला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा अमिरातीत खेळवावी लागली होती. आता पुढील वर्षी ५०-५० षटकांची स्पर्धा भारतात होणार आहे. त्यासाठी हा अनुभव निश्चितच उपयोगी ठरेल. दर वर्षी ‘आयपीएल’ झाली की खेळाडूंसाठी काय मिळाले, हा प्रश्न उपस्थित होतो. कारण या स्पर्धेतून मिळणारा प्लॅटफॉर्म नवसंजीवनी देणारा असतो. दिनेश कार्तिक हे यंदाचे उत्तम उदाहरण. अधिकृतपणे तो निवृत्त झाला नव्हता; पण समालोचनाचे करियर त्याने पक्के केले होते; मात्र ‘आयपीएल’मध्ये त्याने केलेली तोडफोड फलंदाजी भल्याभल्यांना थक्क करणारी होती. स्वतःहून त्याने भारतीय संघातील पुनरागमनाचा मार्ग ३६व्या वर्षी तयार केला.

‘आयपीएल’ केवळ ‘तरुणां’चीच नाही, हेसुद्धा कार्तिकने सिद्ध केले. त्याच वेळी आपल्या देशातही अतिजलद वेगाने मारा करणारा उमरान मलिकसारखा हिरा या आयपीएलमधून चमकला, ही केवळ दोन उदाहरणे; पण तंदुरुस्त नसल्यामुळे वर्षभर क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिक पंड्याने ‘तो आला... खेळला आणि जिंकून गेला..!’ असे म्हणायला लावले. आता त्याच्याकडे भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिले जाईल. कर्णधार म्हणून रोहित शर्माचा उदय ‘आयपीएल’मधील यशामुळे झाला होता. अर्थात या व्यावसायिक लीगमधील चमक भारतीय संघात परिवर्तित होणे महत्त्वाचे आहे. २०२१मधील ‘आयपीएल’चा अनुभव ताजा असतानाही ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळीत गारद होण्याची वेळ आली होती. आता काही महिन्यांत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळाले, तरच यंदाची ‘आयपीएल’ सफल संपूर्ण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT