nda sakal media
editorial-articles

एनडीए, नेव्हल ॲकॅडमीची १४ नोव्हेंबरला लेखी परीक्षा

देशातील सुमारे ७० केंद्रांवर ही लेखी परीक्षा होणार आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने घेण्यात येणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि नेव्हल ॲकॅडमीची लेखी परीक्षा १४ नोव्हेंबरला होणार आहे. या परिक्षेचे प्रवेशपत्र नुकतेच यूपीएससी मार्फत ऑनलाइन उपलब्ध केले आहे. ही परीक्षा ५ सप्टेंबरला होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता महिला उमेदवारांना देखील ही परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ती नोव्हेंबरमध्ये घेण्यात येत आहे.

देशातील सुमारे ७० केंद्रांवर ही लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होल. परिक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांसाठी ऑनलाइन उपलब्ध आहे. दरम्यान, परीक्षेच्या एक आठवड्यापूर्वी पर्यंत उमेदवारास प्रवेशपत्र न मिळाल्यास त्याने त्वरित आयोगाशी संपर्क साधावा, असे आवाहन यूपीएससीमार्फत करण्यात आले आहे.

प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे ही यूपीएससीने नमूद केले आहे. तर उमेदवारांना अधिक माहिती तसेच, प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी यूपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

AI and post‑2000 era : दोन हजारोत्तरी काळ, डिजिटल क्रांती आणि एआयचा उदय; बदलत्या जगातल्या आपल्या जाणिवांचा वेध

Facebook Fraud Marriage : फेसबुकवरून ओळख, अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचा विश्वास; रायगडचे कुटुंब कोल्हापुरात आलं अन् घडलं भलतचं...

SCROLL FOR NEXT