dhing tang
dhing tang 
संपादकीय

दिवाळीच्या शुभेच्छा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

(आशा, अपेक्षा आणि इच्छा...)

स र्वप्रथम आमच्या लाखो लाखो वाचकांना दीपावलीच्या (खऱ्याखऱ्या) शुभेच्छा. औंदा दिवाळीचा माहौल टाइट असून, एकमेकांना शुभेच्छा देण्याचा काळ आला आहे. आम्हाला हा काळ भारी प्रिय असतो. कां की, पत्रकारितेचे असिधाराव्रत घेतलेल्या मोजक्‍या पत्रकारांमध्ये आमची जिम्मा होत असल्याने आम्हाला समाजाच्या विविध स्तरांमधून शुभेच्छा भेटत असतात. लोकांचे प्रेमच एवढे अलोट, की आम्हाला शुभेच्छा नाकारणे फार्फार जड जाते. एक बुद्धिवंत, सव्यसाची (ह्या शब्दाचा अर्थ आजवर लागलेला नाही... असो.) पत्रकार म्हणून आमचा लौकिक असल्यामुळे आमची ऊठबस थोरामोठ्या नेते-पुढाऱ्यांमध्ये असते. हे वेगळे सांगायला नकोच. थोरामोठ्यांना पुरेसा वेळ नसल्याने दिवाळी आली की आम्हीच उठून त्यांच्याकडे जाऊन तासंतास बसतो व बॉक्‍सभर शुभेच्छा घेऊन येतो. काही थोर पुढारी निष्कारण कुरिअरचा खर्च करतात. त्यामुळे आम्हाला काही वेळा घरीच अडकून पडायला होते. कुणी ह्याला दिवाळीचे पोस्त मागत फिरतो, असे म्हणेल! पण पोस्त मागायला आम्ही काय ‘हे’ आहोत काय? शुभेच्छा कशा द्याव्यात ह्याची काही मार्गदर्शकतत्त्वे आम्ही येथे देत आहो.

१. गेल्या वर्षीच्या (उरलेल्या) भेटवस्तू नव्याने खपवू नयेत.
२. दुसरीकडून आलेल्या भेटवस्तू पुढे सरकवताना त्यावरील जुने नाव खोडण्याची तसदी तरी घ्यावी.
३. हल्ली मिठाई किंवा चाकलेटे देण्याचे प्रमाण इतके का घटले आहे? मिठाई व्यवसायावरील हे गंडांतर दूर व्हावे, ह्यासाठी थोडा खर्च करावा.
४. हल्ली जो उठतो तो काजू, बदाम आणि मनुकांची पाकिटे सरकवताना दिसत आहे. काजू, बदाम आम्ही एरव्ही फोडणीच्या भातात घालावेत, असे संबंधितांना वाटते काय?
५. जुने सरकार जाऊन नवे सरकार आल्यापासून आमच्या शुभेच्छा रोडावल्या आहेत, हे निरीक्षण नोंदविताना आमच्या पत्रकारमनाला कमालीच्या यातना होत आहेत. हल्ली कोणी ज्यूसर, मिक्‍सर आदी दमदार भेटवस्तू देताना का आढळत नाही?
६. नोटाबंदीनंतर तर शुभेच्छांचा जणू दुष्काळ पडल्याचे जाणवते आहे. ह्यापुढे (परिस्थितीत बदल न झाल्यास) आम्ही जीएसटी, रेरा आदी सर्व गोष्टींवर टीका करण्याचे धोरण स्वीकारणार आहो!
७. मुख्यमंत्र्यांच्या भेटवस्तूमध्ये आम्हाला एक साडी आढळून आली. (गेल्या वर्षी सेम साडी होती!) ह्या साडीमुळे पत्रकारांच्या संसारात तिढे निर्माण होतात, ह्याकडे सरकारचे लक्ष आहे काय?
८. एका विरोधी पक्षनेत्याने निवडक पत्रकारांना ‘टॅब’ वाटल्याची अफवा उठल्याने जो तो त्यांच्या बंगल्यावर धावला. परंतु, ही अफवाच असल्याचे सांगण्यात आले. ह्यामुळे सर्व पत्रकारितेला प्रचंड मनस्ताप झाला, ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
९. सार्वजनिक बांधकाम खात्यास विशेष सूचना : ज्यूसर मिक्‍सर आदी भेटवस्तू रिपीट झालेल्या चालतील. त्याला बाजारात चांगला रेट आहे.
१०. दादरच्या एका भरभक्‍कम नेत्याने परदेशी चाकलेटे पाठवण्याचा आपला गोड परिपाठ बंद करून यंदा दिवाळीचा फराळ पाठवला. चाकलेटाची जागा चकलीने घ्यावी, ह्याला परिवर्तन म्हणावे की नवनिर्माण असा पेंच निर्माण झाला आहे. (टीप : फराळातील जिन्नस अप्रतिम!!)
११. उभ्या हयातीत आम्ही जे काही काजू-बदाम आणि किसमिस खाल्ले ते दिवाळीच्या पोस्तातील पाकिटातलेच. परंतु, हल्ली हल्ली आमची प्रकृती क्षीण होऊ लागली आहे, हे खरे आहे. ह्याला अच्छे दिन कोण म्हणेल?
१२. शेवटचे आणि महत्त्वाचे : आम्ही क्‍याश, (टीडीएस कापून) चेक आदी कुठल्याही स्वरूपात निधी स्वीकारतो.

...उपरोक्‍त मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून मगच भेटवस्तूरुपी शुभेच्छांचे वाटप करावे (आणि आम्हालाही बोलवावे) ही नम्र विनंती. कळावे.
वि. सू. : आधी फोन करण्याची अथवा अपॉइंटमेंटची गरज नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT