Geological map of the moon
Geological map of the moon 
happening-news-india

सर्च-रिसर्च : चंद्राचा भूशास्त्रीय नकाशा

सुरेंद्र पाटसकर

आपण नुसत्या डोळ्यांनी जरी चंद्राचे निरीक्षण केले तरी त्यावर आपल्याला काही ठिकाणे काळपट तर काही उजळ दिसतात. चंद्रावरील डोंगर-दऱ्यांमुळे तसे आपल्याला दिसते हे त्याचे एक प्राथमिक कारण आहे. तसेच चांद्रभूमीच्या विविधतेचे ते एक लक्षण आहे.

चंद्राच्या जमिनीमध्ये असलेल्या खनिजांचा शोध घेण्याचा प्रयत्न कित्येक वर्षापासून होत आहे. त्यात आता काही प्रमाणात यश आले आहे. चंद्राचा भूशास्त्रीय नकाशा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. चंद्रावरील दगडांच्या रचनेचा आतापर्यंतचा सर्वांत सखोल नकाशा असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

चांद्रगर्भाच्या सविस्तर माहितीबरोबरच भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी या नकाशाचा उपयोग होऊ शकणार आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा, टेक्सासमधील ‘लुनार प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट’ आणि अॅरिझोनातील ‘अॅस्ट्रॉलॉजी सायन्स सेंटर’मधील शास्त्रज्ञांना एकत्र येऊन हा नकाशा तयार केला आहे. अमेरिकी भूगर्भशास्त्र सर्वेक्षण संस्थेची (यूएसजीएस) यासाठी मदत झाली. अपोलो चांद्र मोहिमा, उपग्रहांची ताजी छायाचित्रे यांच्या वापर करून हा नकाशा तयार करण्यात आला आहे. सगळ्या छायाचित्रांची छाननी आणि एकीकरण करण्यासाठी संगणकाच्या सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली. याशिवाय आतापर्यंत झालेल्या संशोधनांतील माहितीचा आधार नकाशा तयार करताना घेण्यात आला. चंद्रावरील दऱ्या, डोंगर, भंगा, कडे आदींची माहिती विविध मोहिमांत आणि अभ्यासांत गोळा करण्यात आली आहे. त्यांना नावेही देण्यात आली आहेत. त्यांचाही वापर करण्यात आला. भविष्यात आणखी सविस्तर आणि सखोल नकाशा तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. 

पृथ्वीवर जमिनीचे विविध स्तर आहेत आणि जमिनीची विविध प्रतले आहेत. तशा प्रकारची प्रतले चंद्रावर नाहीत. तेथील पृष्ठभाग आणि त्याखालील जमिनीची रचना वेगळी आहे. आता  पुढील मोहिमांच्यावेळी नेमके कोणत्या भागात यान उतरवायचे, तसेच कोणत्या भागात खनिजे जास्त असण्याची शक्यता आहे, याची माहिती नकाशाच्या आधारे मिळू शकेल. नासाची नियोजित चांद्रमोहीम २०२४मध्ये आहे. 

भौगोलिकदृष्ट्या प्रत्येक भागाचा कालखंड निश्चित करण्याचा प्रयत्नही शास्त्रज्ञांनी केला. आधी वेगवेगळे सहा नकाशे तयार करण्यात आले. त्यानंतर ते सूत्रबद्ध पद्धतीने एकत्र केले गेले. अमेरिकेच्या ‘लुनार ऑर्बिटर लेसर अल्टिमीटर’ आणि   जपानच्या ‘सेलेने कायुगा टेरिन कॅमेरा स्टिरिओ’ या उपकरणांचा वापर यासाठी केला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT