harshal-bhosale 
संपादकीय

यशाचा ‘हर्ष’

रजनीश जोशी

सोलापूर जिल्ह्यातील भीमानदीकाठच्या तांडोर गावाचं नाव एरवी बातमीत येई ते तिथल्या अवैध वाळूउपशामुळं. पण आता हे गाव देशभरात पोचलं आहे ते हर्षल ज्ञानेश्‍वर भोसले या तरुणामुळं. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवेच्या (आयईएस) परीक्षेत हर्षल देशात पहिला आला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर सुरू झालेल्या त्याच्या ओढगस्तीच्या जीवनाला आता आकार मिळाला आहे. आई कमल भोसले यांनी पाच मुली आणि लहानग्या हर्षलचा सांभाळ करण्यासाठी अक्षरशः रक्‍ताचं पाणी केलं. साडेतीन एकरांचा जमिनीचा तुकडा असूनही कसायला कुणी नव्हतं. मग दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून, पडेल ती कामं करून त्या माऊलीनं हर्षलला शिक्षण दिलं. मंगळवेढ्यात प्राथमिक शिक्षण, देगावच्या आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षण, बीडला डिप्लोमा आणि कऱ्हाडला पदवी अशी भटकंती त्यानं केली. आईनं हर्षलला हिंमत हरू दिली नाही. हर्षलनं देशात पहिलं येणं हा तिचाही मोठाच गौरव आहे.

हर्षलला आता देशाच्या संरक्षण विभागात काम करायचं आहे. त्यानं प्राधान्यक्रमात ‘डिफेन्स’ला प्रथम स्थान दिलं आहे. येत्या काही दिवसांत तो रुजू होईल. शिकण्यासाठी ससेहोलपट होऊनही देशाची सेवा करण्याचं स्वप्न हर्षलनं उराशी बाळगलं आहे. प्राण पणाला लावून लढणाऱ्या जवानांसाठी आवश्‍यक असलेली तांत्रिक सुविधा अव्वल दर्जाची असली पाहिजे. म्हणून तांत्रिक विभागातील ‘क्वॉलिटी कंट्रोल’मध्ये हर्षलला रस आहे. अनंत अपेष्टा सोसूनही देशाचाच पहिला विचार करण्याचा गुण नव्या पिढीत आला तो या मातीतूनच. आईच्या काबाडकष्टाचे पांग देशसेवा करून फेडण्याची हर्षलची भावना आहे. ‘कितीही विपरीत परिस्थिती असली, तरी धीर न सोडता मेहनत घेत राहा,’ असा संदेश त्यानं तरुणांना दिला आहे. मराठी माध्यमात शिक्षण झालं, तरी हिंदी-इंग्रजीवर प्रभुत्व मिळवता येतं, इंग्रजीचा बाऊ करण्याचं कारण नाही, हेही त्यानं स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे. एकापाठोपाठ एक संकटं येत गेली, तरी हर्षलनं जिद्द सोडली नाही. हर्षलसारखी तरुणाई संरक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगून असते, तेव्हा त्याच्याबरोबरच देशाचंही भविष्य उज्ज्वल असल्याची खात्री पटते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: ''मराठ्यांना EWS अन् SEBC आरक्षण नकोय का? उत्तर द्या'' छगन भुजबळांचा समाजाला प्रश्न

Vadgaon Sheri News : पादचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; नगर रस्ता, अतिरिक्त आयुक्त आणि आमदार पठारे यांच्याकडून पाहणी

Kannad Crime : गौताळा अभयारण्यात आढळलेला मृतदेहच्या हत्येचा गुन्हा उघडकीस; संशयित मित्राला अटक

Georai News : उपसरपंचाचा प्रताप! हवेत गोळीबार करून व्हिडिओ सोशल मिडियावर केला व्हायरल!

Hyderabad Nizam: हैदराबादच्या निजामाचं तृतीयपंथीयावर होतं प्रेम; राणीचा दिला दर्जा, पण शेवटच्या क्षणी...

SCROLL FOR NEXT