Hous of Bamboo sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : आमचा ‘मंगो’ हॉलिडे...!

नअस्कार! महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आसपास फिरकायचं नाही, असं मी आता ठरवलं आहे. कधीही गेलं की अंतर्मुख झाल्याशिवाय तिथनं परतताच येत नाही.

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आसपास फिरकायचं नाही, असं मी आता ठरवलं आहे. कधीही गेलं की अंतर्मुख झाल्याशिवाय तिथनं परतताच येत नाही. मंगळवारीही चांगली हसायला म्हणून गेले आणि अंतर्मुख होऊन परत आले. माणसानं अंतर्मुख व्हायचं तरी किती?

आमच्या अतिशय लाडक्या लेखिका मंगलाताई गोडबोले यांना ‘मसाप’चा पुसाळकर पुरस्कार मंगळवारी प्रदान करण्यात आला. विनोदी लेखनासाठीचा हा पुरस्कार आहे हं! ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी आपल्या आईवडलांच्या स्मृत्यर्थ दोन पुरस्कार ठेवले आहेत. म्हणजे त्यांनी दिलेल्या देणगीतूनच हे पुरस्कार ‘मसाप’तर्फे दिले जातात.

पैकी रा. द. पुसाळकर स्मृती पुरस्कार मंगलाताईंना देण्यात आला, तर इंदुमती पुसाळकर स्मृती पुरस्कार रमा गोळवलकर यांना मिळाला. हा पुरस्कार उत्कृष्ट रहस्यकथा लेखनासाठीचा आहे. पण पुरस्कार घ्यायला रहस्यमयरित्या अनुपस्थित होत्या. कदाचित वेषांतर करुन आल्या असतीलही.

समारंभ आटोपशीर आणि चांगला झाला. माझ्यासाठी तर हा ‘मंगो’हॉलिडेच होता, म्हणून मी गेले. मंगलाताईंना पुरस्कार प्रदान करायला मराठीतील अत्यंत गंभीर साहित्यिक भारत सासणे(साहेब) आले होते. त्यामुळे ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचं मात्र आयतं फावलं. ‘भारत भारती’मुळे हा पुरस्कार अखिल भारतीय झाला आहे, अशी शाब्दिक कोटी त्यांना करता आली.

या जोशीसरांच्या कोट्यांमुळे आमच्या उद्धवजींनाही न्यूनगंड येईल, अशी सध्या परिस्थिती आहे. काय बोलणार? (अंतर्मुख व्हायचं, झालं!) आपला पुरस्कार नीट दिला जातो आहे की नाही, हे बघायला खुद्द भारती पांडेदेखील मंचावर उपस्थित होत्या. आमचे सासणेबुवा म्हणजे अगदीच गंभीर प्रकृतीचे. ‘गूढगुंजन, असांकेतिक, जाणीव-नेणीवेच्या पातळीवरचे काहीतरी’ असं सासणेबुवा लिहितात.

‘परदेशी साहित्यात विनोदी साहित्य आणि रहस्यकथांना फार प्रतिष्ठा आहे, आपल्याकडे नाही’ असं त्यांनी इतक्या गंभीरपणाने सांगितलं की पटवर्धन सभागृहातलं वातावरणच गंभीर झालं. मी जागच्याजागी अंतर्मुख झाले. मागे एकदा सासणेबुवांनी ‘हल्लीचा काळ भ्रमयुग आहे’, असं म्हटलं होतं. तेव्हाही मी अंतर्मुख झाले होते.

सर्वाधिक अंतर्मुख केलं ते मंगलाताईंनीच. ‘विनोदी लिखाण करताना स्त्री म्हणून मर्यादा येतात,’ असं त्या म्हणाल्या. मध्यंतरी मी काही कविता लिहिल्या होत्या, तेव्हा तुम्ही विनोदी साहित्य चांगलं लिहू शकाल, असं मला एका जागतिक कीर्तीच्या (पक्षी : पुण्याच्या) साहित्यिकानं सांगितलं होतं. असो.

विनोदाच्या व्यापारात पुरुषांचीच चलती कायम राहिली आहे, हे तर खरंच. ब्रिटिश वाङमयातही विनोदाचा प्रांत प्राय: डिकन्स, वाइल्ड, वुडहाऊस प्रभृतींकडे राहिला असला तरी व्हर्जिनिया वुल्फ, जेन ऑस्टेनपासून मरीना हाइडपर्यंत बऱ्याच विनोदी लेखिकांनीही या प्रांतात चांगली लागवड केली. त्या मानानं आमच्या मंगलाताईंनी मराठीच्या मुलुखात एकहाती विनोदाचा किल्ला लढवत ठेवला आहे.

अर्थात त्यांनी फक्त विनोदीच लिहिलं असं नाही. नभोनाट्यांपासून समीक्षेपर्यंत त्यांनी विपुल लिखाण केलं आहे. एकाअर्थी त्या मराठीच्या जेन ऑस्टेन किंवा व्हर्जिनिया वुल्फच आहेत, असं मी म्हणेन! आमच्या स्नेही वंदना बोकिल-कुलकर्णी यांनी तर ‘निवडक मंगला गोडबोले’ हा ग्रंथच संपादित करुन मोठं काम करुन ठेवलं आहे. त्यांना ही आयडिया सुचवली पाहिजे!! विनोदाच्या प्रांतात लेखिका मागे का? लेखिकांनी पुढं यायलाच हवं ना?

मंगलाताईंनी आता साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हावं, अशी सूचना सासणेबुवांनी गंभीरपणाने केली आहे, हे मंगलाताईंनी ध्यानी घ्यावं, आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीला लागावं. मंगलाताई ज्या दिवशी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होतील, तो सुदिन. आम्ही त्या दिवसाची चातकासारखी वाट पाहू. मंगलाताईंचं मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष, डाळींबाचे मोठे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT