nalini jamila sakal
संपादकीय

‘नाम’ मुद्रा : कुरूप व्यवस्थेविरुद्धचा लढा

नलिनी जमिलाचा संघर्ष वयाच्या नवव्या वर्षापासून सुरू होतो. केरळमधल्या त्रिस्सूरमध्ये १९५४ मध्ये तिचा जन्म झाला. वडिलांनी तिला वीटभट्टीवर कामाला धाडले.

जयवंत चव्हाण

नलिनी जमिलाचा संघर्ष वयाच्या नवव्या वर्षापासून सुरू होतो. केरळमधल्या त्रिस्सूरमध्ये १९५४ मध्ये तिचा जन्म झाला. वडिलांनी तिला वीटभट्टीवर कामाला धाडले. आईची मिलमधली नोकरी गेली. त्यामुळे हालअपेष्टा वाढल्याच. अशात भट्टीवर काम करणाऱ्या नलिनीला लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागला. आपला बाप आईला मारझोड करतो, हे ती नेहमी पाहायची. अशा बापाला कोणी प्रश्न का विचारत नाही, असे तिला वाटायचे. तेव्हापासून पितृसत्ताक पद्धतीबाबत तिच्या मनात घृणा निर्माण झाली.नंतर नलिनीने सरकारी शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. प्रथेप्रमाणे तिचे एका दारू गाळणाऱ्याशी लग्न झाले. लग्नानंतर तरी सुखी-सुरक्षित जगण्याची अपेक्षा करावी तर तिथेही वंचनाच पदरी पडली. दरम्यानच्या काळात दोन मुली झाल्या. पतीचेही कर्करोगाने निधन झाले. परिस्थितीमुळे ती देहविक्रयाकडे ढकलली गेली. अनेक कडवे, विदारक अनुभव तिने घेतले. पहिल्या पतीच्या निधनानंतर तिने दोनदा लग्न केले. तिसऱ्या पतीच्या कुटुंबाने स्वीकारावे यासाठी नावही बदलले. त्यामुळे कदाचित या महिलांच्या हक्कांसाठी, त्यांना पाठबळासाठी काही तरी करावे, असे नलिनीला वाटले आणि तिने तशी पावलेही उचलली. त्यातून जन्माला आली सामाजिक कार्यकर्ती, लेखिका आणि वेशभूषाकार... नलिनी जमिला.

देहविक्रय करणाऱ्या महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेकदा नलिनी रस्त्यावर उतरल्या. आंदोलने केली, सरकारदरबारी धडक दिली. काही स्वयंसेवी संस्थांबरोबर कामेही केली. देहविक्रय करणाऱ्या महिलांना पुन्हा मागे जाण्याचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे त्यांना मानाने जगण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने काही तरी करावे यासाठी नलिनी आजही धडपडतात. केरळमधील पाच स्वयंसेवी संस्थांचे काम सध्या त्या करतात.

नलिनी यांचा हा आयुष्याचा पट त्यांनी २००५ मध्ये ‘ओरू लिम्गीकाथोझिलालियुदे आत्मकथा’ (देहविक्रय करणाऱ्या महिलेची आत्मकथा) या पुस्तकात मांडला. या पुस्तकात त्यांनी स्वतःची जिंदगी इतकी वास्तववादी मांडली, की अल्पावधीत म्हणजे पहिल्या शंभर दिवसांत त्याच्या तेरा हजार प्रती संपल्या आणि सहा आवृत्त्या काढाव्या लागल्या. पुस्तकाच्या विषयाने केरळमध्ये खळबळ उडवून दिली, अनेक वादविवादही झाले. बेस्टसेलर ठरलेल्या पुस्तकाचे मराठी, इंग्रजी, फ्रेंच असे विविध भाषांमध्ये भाषांतर झाले. २०१८ मध्ये ‘रोमँटिक एन्काऊंटर्स ऑफ सेक्स वर्कर’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. यामध्ये नलिनी यांनी त्यांच्याकडे आलेल्या पुरुषांबाबत लिहिले आहे. याही पुस्तकाचे इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले.

आता तिसऱ्या पुस्तकावर नलिनी यांचे काम सुरू आहे. संयुक्त राष्ट्राच्या विकास प्रकल्पांतर्गत दिग्दर्शक संजीव सिवन यांनी नलिनी जमिला यांच्या आयुष्यावर लघुपटही बनवला आहे. शिवाय हैदराबादमधील रंगकर्मींच्या गटाने त्यांच्यावर नाटकही बसवले आहे. नुकताच त्यांना केरळ सरकारचा प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. ‘भारथपुझा’ चित्रपटातील वेशभूषेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला. देहविक्रय करणाऱ्या महिलेवर हा चित्रपट आहे. त्यामुळे तिची वेशभूषा करताना मी माझाच विचार त्या जागी केला, असे नलिनी जमिला सांगतात. देहविक्रय करणारी महिला ते सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि आता वेशभूषाकार असा नलिनी यांचा प्रवास आहे. त्यांचा लढा अथक सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT