German Pattern of Waste Management sakal
संपादकीय

कचरा व्यवस्थापनाचा ‘जर्मनी पॅटर्न’

जर्मनीमध्ये आल्यापासून सतत असं वाटते की, आपला देशदेखील असा होऊ शकतो. मनात आणले तर सगळे काही शक्य आहे.

जीवन करपे

कचरा संकलन, त्याचे व्यवस्थापन, पुनर्प्रक्रिया आणि संकलन व्यवस्थेत काटेकोर सूत्रबद्धपणा यामुळे स्वच्छता आणि टापटिप जर्मनीत सगळीकडे दिसते. यात अनुकरणीय बाबी खूप आहेत. त्याविषयी...

जर्मनीमध्ये आल्यापासून सतत असं वाटते की, आपला देशदेखील असा होऊ शकतो. मनात आणले तर सगळे काही शक्य आहे. इथल्या नागरी यंत्रणेमध्ये, नागरिकांमध्ये कमालीची जागरुकता आहे. नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याकडून वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक घरामध्ये एक कॅलेंडर येते. ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की, कुठल्या दिवशी तुमच्या घराच्या दारातून कोणता कचरा उचलला जाणार आहे.

ही सर्व जबाबदारी नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीची असते. या सर्व सुविधा नागरिकांना सशुल्क देण्यात येतात. उदा. मला जानेवारीमध्ये नमूद केलेले वार्षिक शुल्क ९८ युरो, म्हणजेच आठ हजार६६६ रुपये आहे. मी हे पैसे भरले तर दिलेल्या दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभर ते माझ्या दारातून कचरा उचलून घेऊन जाणार.

त्याच्यामध्ये प्लास्टिक, रद्दी पेपर, ओला व इतर कचरा आणि या सर्वांचे एक स्वतंत्र पिंप प्रशासन सःशुल्क प्रत्येकाला देते आणि ते कंटेनरसारख्या आकाराचे व वेगवेगळ्या रंगाचे असतात. ही योजना संपूर्ण देशामध्ये सारख्या पद्धतीनं राबवली जाते. त्या पद्धतीत कुठल्याही प्रकारचा बदल नसतो. उदा. ओला कचरा (बीओ कचरा) साठविण्यासाठी विघटन होणारी बॅग वापरावी लागते.

ती चॉकलेटी रंगाच्या पिंपामध्ये ठेवली जाते. पेपर रद्दीचा पिंप काळा असतो. बागेतील गवत, पालापाचोळा इत्यादी मोठ्या विशिष्ट कागदी पिशवीमध्ये आदल्या दिवशी रात्री घराबाहेर ठेवल्याने सकाळी नगरपालिका/ग्रामपंचायतीचे कर्मचारी ते मोठ्या गाडीमध्ये घेऊन जातात.

असे होते कचरा संकलन

नुकत्याच माझ्या मित्राच्या घराच्या शिफ्टिंगच्या कारणास्तव ‘एंटजोरगुंग चेन्ट्रुम’ म्हणजे जर्मनीतील कचरा डेपो पाहायला मिळाला. घरातील सोफा, फर्निचर, विजेच्या वस्तू, पेपर्स, थर्माकोल, प्लास्टिक, लोखंड, लाकडाच्या वस्तू अशा अनेक गोष्टी तिथे भंगारात देण्यासाठी आम्ही गेलो होतो. शिस्तबद्ध कचरा डेपो आयुष्यामध्ये मला पहिल्यांदा तिथं पाहायला मिळाला.

जिथे या प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळे भाग होते. तेथे प्रवेश करताच कचरा डेपोच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगायचे की, सोबत कोणकोणत्या वस्तू आणल्या आहेत. ते पावती करून देतात. म्हणजे तुम्ही पैसे भरायचे आणि त्या सर्व वस्तू त्या-त्या ठिकाणी नेऊन ठेवायच्या. जेणेकरून पुनर्प्रक्रिया करायला सरकारला किंवा कचरा डेपो व्यवस्थेला सोपे जाते. ही अशी व्यवस्था देशभर राबविली जाते.

प्रत्येक घरामध्येही अशीच व्यवस्था असते. घरामध्येही कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. म्हणजे प्रत्येक टाकाऊ वस्तूसाठी जागा आणि प्रत्येक टाकाऊ वस्तू त्या जागेमध्ये. आठवड्याला किंवा दोन आठवड्याला एकदा ‘बीओ’ म्हणजे ओला कचरा चॉकलेटी रंगाच्या पिंपामध्ये ठेवला जातो. कचरा उचलणारे अत्याधुनिक वाहन येते आणि घराच्या दारातून हा कचरा उचलतात.

प्लास्टिक कचरा प्रत्येक घरामध्ये मोठ्या पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगमध्ये गोळा केला जातो. तोदेखील दर दोन आठवड्यातून घराच्या दारातून उचलला जातो. सर्व रद्दी काळ्या पिंपामध्ये ठेवली जाते आणि एक किंवा दोन महिन्यातून एकदा रद्दीदेखील अत्याधुनिक वाहनातून नेली जाते. वाहन चालक बटन दाबतो आणि स्वयंचलित यंत्रणा घराबाहेरील पिंप उचलून त्यातील कचरा कंटेनरमध्ये रिकामा करून पिंप परत जागेवर ठेवते.

..अन्यथा दंड

शहर किंवा गावांमध्ये एका विशिष्ट ठिकाणी मोठे कंटेनर असतात. जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये घरातील जुने कपडे, चपला, शूज टाकू शकता. घरातील काचेच्या वस्तू, बाटल्या इत्यादी. त्यातही चॉकलेटी, पांढऱ्या आणि इतर बाटल्या यांचेदेखील स्वतंत्र कंटेनर असतात. तुम्ही काचेच्या वस्तू त्या कंटेनरमध्ये टाकू शकता. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. अन्यथा भला मोठा दंड आकारला जातो.

कोणाला घरातील सुस्थितीतील वस्तू गरजूंना विनामूल्य द्यायच्या असतील, उदा. खुर्ची, टेबल, शोभेच्या वस्तू, वॉशिंग मशीन/फ्रीज इत्यादी तर घराबाहेर एका कागदावर नमूद करून ठेवू शकता. गरजू लोक या वस्तू तुमच्या घराबाहेरून घेऊनही जातात. जेणेकरून गरजू कुटुंबाला या वस्तू विनामूल्य मिळतात.

जबाबदारीची जाणीव

जर्मन सरकार नागरिकांना सर्व सुख-सुविधा पुरविते. अर्थात त्या सःशुल्क आणि सरकारकडे जमा होणाऱ्या करातूनच असतात. जरी असे असले तरी इथले नागरिक खूप जागरूक असून, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. त्यामुळे रस्ते, पदपथ, नदी-नाले, घराचा परिसर, बस-रेल्वे स्थानक, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या सगळीकडे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबद्दल जागरुकता दिसते.

रस्त्यावरून जाताना चॉकलेट खाल्ले किंवा हातात काही टाकाऊ वस्तू असेल तर ते रस्त्यावर न टाकता खिशामध्ये किंवा जवळच्या पिशवीमध्ये साठवून घरी आणले जाते. त्या कचऱ्याचे ज्या त्या ठिकाणी वर्गीकरण करतात. नागरिक कापडी पिशव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणावर करतात, जेणेकरून प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनामध्ये कमी होतो. परिणामी प्लास्टिक नदी, नाले, समुद्रात कमी प्रमाणात मिसळते.

पिशव्या कापडी हव्यात

दरवर्षी आपण पाहतो मुंबईमध्ये नाले कचऱ्याने तुंबतात. जर कचरा व्यवस्थापन युरोपप्रमाणे केले तर आणि त्यातल्या त्यात प्रायोगिक तत्त्वावर मुंबईमध्ये सुरू केले, तर त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये यामध्ये प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायला हवा. प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांच्या वापराला प्राधान्य द्यावे, त्याबाबत प्रबोधन करावे. जेणेकरून प्लास्टिक रस्त्यावर येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT