Language Sakal
संपादकीय

शिक्षण-सर्जन : माईंडमॅपमधून शब्दसंपत्ती

माणूस मुळातच समाजशील प्राणी. समाजात वावरताना तो आपल्या विचारांची, अनुभवांची, भावनांची देवाण-घेवाण एकमेकांशी करतो. त्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम असतं ते म्हणजे भाषा.

खंडू मोरे

माणूस मुळातच समाजशील प्राणी. समाजात वावरताना तो आपल्या विचारांची, अनुभवांची, भावनांची देवाण-घेवाण एकमेकांशी करतो. त्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम असतं ते म्हणजे भाषा.

माणूस मुळातच समाजशील प्राणी. समाजात वावरताना तो आपल्या विचारांची, अनुभवांची, भावनांची देवाण-घेवाण एकमेकांशी करतो. त्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम असतं ते म्हणजे भाषा. आपल्या देशात सुमारे एक हजारपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. दर बारा कोसानंतर बोलीभाषा बदलते, असं म्हटलं जातं. कोणतीही भाषा प्रभावीपणे बोलायची असेल, तिचा प्रभावीपणे वापर करायचा असेल, मनातील विचार अभिव्यक्तीच्या रुपाने बाहेर पडायचे असतील तर आवश्यकता असते ती चपखल शब्दांची. त्यासाठी अर्थातच शब्दसंपत्ती हवीच हवी. शब्दसंपत्ती कमी असेल तर अभिव्यक्तीला मर्यादा येतात. ज्याची शब्दसंपत्ती चांगली तो उत्तम प्रकारे लिहू शकतो. भाषण करू शकतो. आपले विचार प्रभावीपणे मांडू शकतो.

शाळेत नव्याने आलेल्या मुलांची शब्दसंपत्ती तशी खूपच मर्यादित असते. गाणी, गप्पा, गोष्टी, भाषिक खेळ आणि विविध उपक्रम यांच्याद्वारे, मित्रांसोबत गप्पा मारून, पुस्तकातील मजकूर वाचून हळूहळू विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढायला सुरुवात होते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. ते व्यक्त होऊ लागतात. लिहू लागतात. स्वतःचे मत मांडू लागतात. कोरोना महासाथीच्या कालखंडामध्ये मात्र मुलांच्या भाषिक विकासाला खूपच मर्यादा आल्या. शिक्षणामध्ये अंतर पडलं, नियमितपणे एकमेकांसोबत व्यक्त होणारी मुलं घरांमध्ये कोंडली गेली. सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमामुळे त्यांना मित्रांशी गप्पा मारण्याला मर्यादा आल्या. शाळेमध्ये मुलं मनाला वाट्टेल तसं व्यक्त होतात, गप्पा मारतात तसेच संभाषणही करतात.

कोरोनानंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या. मुलांचा भाषिक विकास व्हावा, त्यांची शब्दसंपत्ती वाढावी यासाठी हनुमाननगर (भारजवाडी) ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील लहू बोराटे यांनी या उसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शाळेमध्ये माईंडमॅपमधून शब्द संपत्तीचा विकास हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी त्यांनी एक एक मूळाक्षर फळ्यावर लिहिणे, त्या अक्षरापासून सुरू होणारे, मुलांना माहीत असणारे अर्थपूर्ण शब्द सांगायला लावणे, मुलांनी सांगितलेले शब्द रंगीबेरंगी खडूंच्या सहाय्याने फळ्यावर लिहिणे, अनोळखी शब्दांचे अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, योग्य त्या ठिकाणी मुलांना मदत करणे, फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचे प्रकट वाचन करणे असा उपक्रमच सुरू केला.

विद्यार्थ्यांनी फळ्यावरील शब्द सुंदर हस्ताक्षरात लिहिणे, सरावासाठी विद्यार्थ्यांनी शब्दांचे घरी पुन्हा वाचन करणे आणि सुवाच्च अक्षरामध्ये पुन्हा लिहिणे, दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचे प्रकट वाचन करून घेणे, असा प्रयोग करण्यात आला. शब्द वाचनाचे व्हिडिओ बनवून ते यू ट्युबवर अपलोड करणे, व्हिडिओच्या लिंक्स पालकांपर्यंत पोहोचवणे, अशा टप्प्याटप्प्याने हा उपक्रम पुढे जात गेला. शाळेत मुलं व्यक्त होत, शिकत गेली. त्यांचा शब्दसंचय वाढत गेला.

या उपक्रमातून प्रत्येक मूळाक्षरापासून सुरू होणारे साधारणतः दीडशे ते पावणेदोनशे शब्द मुलांना समजले. मुलांची वाढ, विकास ज्या वातावरणात झाला त्या वातावरणातील, संस्कृतीमधील, परिसरातील आणि बोलीभाषेतील अनेक शब्द मुलांकडून समजले. या उपक्रमामुळे मुलांच्या वाचनामध्ये लक्षणीय बदल होऊन अनोळखी शब्दांचे प्रकट वाचन मुलं सहजरीत्या करू लागली. अबोल व मितभाषी मुलं उपक्रमात सहभागी होऊन व्यक्त होऊ लागली. आत्मविश्वासात वाढ झाली. मुलांच्या हस्ताक्षरात लक्षणीय सुधारणा झाली. श्रुत लेखनामध्ये सुधारणा झाली. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भाषा विषयाबद्दल आवड निर्माण झाली. मुलं चिकित्सक आणि विविधांगी विचार करू लागतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढलीच त्यासोबत भाषिक विकासही झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT