Olympic Sakal
संपादकीय

ऑलिंपिकसाठी घडताना... : स्वप्न पाहा आणि तयारीला लागा!

सध्याच्या महासाथीच्या परिस्थितीत कोणत्याही देशातील खेळाडू, ॲथलिट आपल्या क्रीडा प्रकारची तयारी करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कोणत्याही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, तसेच ऑलिंपिक स्पर्धेसाठीचे ध्येय हे शालेय जीवनाच्या सुरुवातीलाच समोर ठेवून कठोर मेहनत घ्यावी लागते. शारीरिक आणि मानसिक तयारीचे अनेक प्रकार आणि टप्पेही असतात. यावर्षीचे ऑलिंपिक जपानमध्ये २३ जुलैपासून सुरू होत आहे, त्यानिमित्ताने...

सध्याच्या महासाथीच्या परिस्थितीत कोणत्याही देशातील खेळाडू, ॲथलिट आपल्या क्रीडा प्रकारची तयारी करीत आहेत. सराव, सकारात्मक विचाराद्वारे मनोधैर्य टिकवत ऑलिंपिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांच्यासमोर ते मोठे आव्हान आहे. सध्या आपण रोजच ऐकतो की काही ठिकाणी लॉकडाउन वाढवला, काही सामने रद्द केले, सामने लांबणीवरही पडताहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या सामन्याचे काय, याची काळजी करायची, की स्वतःच्या क्रीडा प्रकाराची तयारी करायची, हा खेळाडूंसमोर पेचही असतो.

प्रत्येक खेळाडूला आपल्या क्रीडा प्रकारच्या तयारीमध्ये आणि कामगिरीमधल्या चढ-उतारांबद्दल आढावा घ्यायला वेळ हवा असतो. हे चढ-उतार पार करून स्वतःच्या कामगिरीची समाधानकारक पातळी गाठणे आवश्यक असते. ते कसे साध्य करायचे हेही आव्हानच असते. प्रत्येक धावपटूला स्पर्धेची तारीख कळायला हवी, कारण त्यावरच त्याच्या सरावाचा आणि व्यायामाचा आराखडा ठरतो. खेळाडूला आहार, व्यायामाची तीव्रता याची आखणी करता येते. ऑलिंपिकसारख्या स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी जी मानसिक तयारी लागते, त्यासाठी खेळाडूंना वेळ मिळायला हवा.

खेळाडूंचे प्रवासाचे नियोजन, सोयी-सुविधा यांची काळजी घेणारी यंत्रणा यांनादेखील तयारीसाठी विशिष्ट कालावधी लागतो. ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अत्युच्च स्पर्धेमध्ये आपली कामगिरी सर्वोत्तम व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते; नव्हे ते त्याचे आयुष्यातले एकमेव स्वप्न असते. त्यासाठी त्यांना तयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला तर त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि उत्साहाने तो तयारीला लागतो.

अशी करतात पूर्वतयारी

आता आपण बघूया, की ऑलिंपिकसारख्या स्पर्धेसाठी एखादा खेळाडू कशी तयारी करतो. कोणताही खेळाडू जेव्हा ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत पोचतो, तेव्हा तो केवळ हुशारीमुळे नव्हे; तर त्यामागे त्याने अनेक दिवस, अनेक वर्षे घेतलेली मेहनत असते. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये खेळण्याचे एखाद्याचे स्वप्न असेल तर त्याला दिवस-रात्र यासाठी झोकून देऊन आवश्यक तो व्यायाम, प्रशिक्षण, आहार, तंदुरुस्ती या सगळ्यांवर मेहनत घेणे गरजेचे असते.

या सरावामध्ये केवळ आपल्या क्रीडा प्रकाराचा सराव करणे, व्यायाम करणे आणि आहाराचे नियोजन करणे याचबरोबर इतरही काही गोष्टींचा समावेश असतो. जसे की स्पर्धात्मक सराव जो मानसिक तणावाखाली व्हायला हवा. कारण अंतिम स्पर्धेत खेळाडूला या तणावाला सामोरे जावे लागतेच. त्याचा सराव जर आधीपासून झाला तर तो फायदेशीर ठरेल. त्यामुळेच खेळाडू मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर बनू शकतो. एखाद्या खेळाडूचा करियरचा काळ सुमारे दहा वर्षाचा असू शकतो. त्या काळातसुद्धा खूप कमी खेळाडू त्यांच्या करियरच्या सर्वोत्तम कामगिरी करू शकतात. ऑलिंपिक स्पर्धा चार वर्षातून एकदा होतात. म्हणजे दहा वर्षात किमान दोन वेळा खेळाडूला स्पर्धेत सहभागाची संधी मिळू शकते. परंतु इतका दीर्घकाळ कामगिरीमध्ये सातत्य राखणे हे देखील आव्हानात्मक असते. लियांडर पेस आणि धनराज पिल्ले यांच्यासारख्या खेळाडूंनी सलग ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. कल्पना करा, त्यासाठी त्यांना किती मेहनत, सराव आणि कष्ट घ्यावे लागले असतील! आॅलिम्पिकसाठी खेळाडू रात्रीत घडत नाहीत, त्याबाबतीत आणखी थोडी सविस्तर माहिती पुढील भागात घेऊया.

कौशल्यविकासासाठी...

  • अंगीकारावी झोकून देण्याची वृत्ती

  • वृत्तीत रुजावा संयम आणि त्याग

  • हवी खेळाशी बांधिलकी

  • शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीवर भर

  • बनवावे सरावाचे वेळापत्रक

  • आत्मसात करावीत मूलभूत कौशल्ये

  • प्रशिक्षणाचे काटेकोर नियोजन

  • समजून घ्यावेत खेळाच्या रणनीतीतील बारकावे

  • हवा योग्य, गुणवत्तापूर्ण आहार, पुरेशी विश्रांती

  • फिटनेस प्रशिक्षक, फिजिओशी सल्लामसलत

  • आहारतज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांचे वेळोवेळी सल्ले

- महेंद्र गोखले

(लेखक ‘फिटनेस ट्रेनर’ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT