PNE18N39057
PNE18N39057 
संपादकीय

जिद्दीचे दुसरे नाव 

डॉ. रतिकांत हेंद्रे

मुरलीकांत पेटकर यांचे इस्लामपूर हे जन्मगाव. लहानपणापासून कुस्तीची आवड; पण घरची गरिबी होती. तालमीमध्ये थंडाई वाटण्याचे काम त्यांना मिळाले. एखादा शिकाऊ पैलवान आला नाही, की त्याच्या बदली ते कुस्ती खेळत. सर्वांना वाटून उरलेली थोडीशी थंडाई त्याबदल्यात मिळे. एकदा एका प्रसिद्ध पैलवानाच्या चेल्यालाच त्याने हरविले. परिणाम? दुसऱ्या दिवशी त्यांना तालमीचे दरवाजे बंद! त्यांना हा अपमान सहन झाला नाही. भारताचे नाव असलेले पदक मिळविल्याशिवाय गावात पाऊल टाकायचे नाही, असा निश्‍चय करून ते गावाबाहेर पडले. पुण्याला येऊन सैन्यात दाखल झाले. तिथे कुस्ती, वेट-लिफ्टिंग, बॉक्‍सिंग यांत प्रावीण्य मिळवले. 

65च्या युद्धात सियालकोट आघाडीवर असताना शरीरात नऊ गोळ्या घुसल्या होत्या. लष्करी रुग्णालयात तब्बल दोन वर्षे ते बेशुद्धावस्थेत होते. नंतर शुद्धीवर आले; मात्र मणक्‍यातील एक गोळी काढता येणं शक्‍य झालं नाही. त्यामुळे कमरेखालचा भाग अधू झाला; मग ते व्हीलचेअरवरून फिरू लागले. पोहोण्याचा व्यायाम सुरू केला. हळूहळू पायांत शक्ती आली. त्या सुमारास मुंबईला अपंगांसाठी क्रीडा-स्पर्धा होत्या.

भालाफेक, वेटलिफ्टिंग, गोळाफेक, टेबल टेनिस आणि नेमबाजीमध्ये पेटकरांनी सुवर्णपदके जिंकली. अमेरिका, इंग्लंड, जपान आदी देशांमधील स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला. त्यांनी आतापर्यंत 291 सुवर्ण, 195 रौप्य व 89 ब्रॉंझपदके मिळविलेली आहेत. एडिम्बरो येथे अपंगांची नववी राष्ट्रकुल स्पर्धा झाली. त्या वेळी 50 मीटर फ्रीस्टाइल पोहोण्याच्या स्पर्धेत सुवर्ण, भालाफेकमध्ये रौप्य व गोळाफेकीत ब्रॉंझपदक मिळवले. त्यानंतर जर्मनी व कॅनडा येथे अपंगांसाठीच्या स्पर्धांमध्ये खेळून 50 मीटर फ्री स्टाइल पोहोण्याच्या नवा विक्रम केला. तर हॉंगकॉंगच्या स्पर्धेत स्वतःचाच विक्रम मोडला. 

होतकरू आणि नवीन खेळाडूंना संधी मिळावी म्हणून पेटकरांनी राष्ट्रीय पातळीवर न खेळण्याचे ठरवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयीन अजिंक्‍य खेळाडूंसाठी त्यांनी पारितोषिक व फिरती ढाल ठेवली आहे. आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण त्यांच्याच शब्दांत सांगायला हवा. "नौदलाच्या मुंबईतील "अश्विनी' या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना इंग्लंडमध्ये होणाऱ्या अपंगांच्या स्पर्धेसंबंधीची बातमी वाचली.

भाग घ्यायची तीव्र इच्छा झाली; पण प्रवासासाठी पैसे नव्हते. त्या वेळी इस्पितळामधील रुग्ण, स्टाफ आणि डॉक्‍टर यांनी माझ्यासाठी वर्गणी काढली. विजय मर्चंट यांनीही मदत केली. मी त्या स्पर्धेत यशस्वी झालो.' "पद्मश्री'ने त्यांच्या कर्तृत्वाचा सार्थ गौरव झाला आहे. जिद्दीचे दुसरे नाव म्हणजे मुरलीकांत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT